नांदगाव : आतापर्यंत ४३८ कोरोना बाधितांना उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:53+5:302021-05-26T04:13:53+5:30
मागच्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात व यावर्षी मार्च, एप्रिलमध्ये दररोज किमान एक ते दोन कॉल असायचे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कोरोना ...
मागच्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात व यावर्षी मार्च, एप्रिलमध्ये दररोज किमान एक ते दोन कॉल असायचे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कोरोना बाधितांना रुग्णालयात पोहोचवले. काही वेळेस एकाला आणायला जाताना दुसरा कॉल येत असे. अशा वेळेस डॉ. बोरसे यांनी दिलेले प्रशिक्षण उपयोगी पडत असे. लक्षण विचारून अंतर ठरवून, गरजेप्रमाणे अंदाज घेऊन काम होत असायचे. आठ महिन्यांपासून चालवत असलेली रुग्णवाहिका आमदार सुहास कांदे यांची असून पगार सुद्धा तेच देतात. आजपर्यंत १५५ रुग्णांसाठी रुग्णवाहिका वापरली गेली आहे.
आठ महिन्यांत घरी जाण्याचे अनेकदा टाळले. रुग्णालयाशेजारी खोली घेऊन दोघे तिघे राहतात. रुग्णवाहिका आर्थिक परिस्थिती बघून मोफत दिली जाते, अन्यथा केवळ इंधनाचे पैसे घेतले जातात. तशा आमदारांच्या कडक सूचना आहेत. हे काम करण्यात खूप समाधान वाटते असे विशाल याने सांगितले. आजपर्यंत ४३८ कोरोना बाधितांना या रुग्णवाहिकेची मदत मिळाली आहे.
-----------------------
आणलेला गंभीर रुग्ण बरा होऊन घरी जाताना भेटतो. तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू माझ्या कामाचे मोल किती आहे. याची आठवण करून देतात.
-विशाल जाधव, रूग्णवाहिका चालक (२५ नांदगाव ॲम्ब्युलन्स)
===Photopath===
250521\25nsk_10_25052021_13.jpg
===Caption===
२५ नांदगाव ॲम्बूलन्स