विवाहितेला मारल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदगाव : संशयितांनी केली होती साडेतीन लाखांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:16 AM2018-05-04T00:16:06+5:302018-05-04T00:16:06+5:30
नांदगांव : शेतावर पाइपलाइन करण्यासाठी अडीच लाख रुपये व जमीन लेव्हल करण्यासाठी एक लाख रु पये असे माहेरून साडेतीन लाखांची मागणी पूर्ण केली नसल्याने विवाहितेचा छळ करून तिला जिवे मारल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिक वृत्त असे, मयत ज्योती सुनील थोरे ही विवाहिता दि. २ मे रोजी सायंकाळी सासरी जळगाव बु. येथे आली होती. तिच्याकडे पती सुनील थोरे, सासरा काशीनाथ थोरे, सासू मीरा थोरे, दीर दीपक थोरे यांनी शेतावर पाइपलाइन करण्यासाठी अडीच लाख रुपये व जमीन लेव्हलसाठी एक लाख रुपये अशा साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण झाली नसल्याने संशयितांनी तिला रात्री मारहाण करून तिला विषारी औषध पाजून जिवे ठार मारले, अशी फिर्याद मयताचे पिता सुधाकर नारायन मुगले रा. वसडी ता. कन्नड जि. औरंगाबाद यांनी नांदगाव पोलिसात दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक यु. बी. पद्मने, श्रावण बोगीर करीत आहे.