नांदगावी आदिवासींचे आमरण उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:46 PM2018-08-03T12:46:42+5:302018-08-03T12:46:53+5:30

नांदगाव : तालुक्यातील टाकळी खु व माणिकपुंज येथील आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनी परत मिळाव्या या मागणी साठी नऊ आदिवासी आमरण उपोषणास बसले असून त्यात सात महिलांचा समावेश आहे.

 Nandgaon tribals continue hunger strike | नांदगावी आदिवासींचे आमरण उपोषण सुरू

नांदगावी आदिवासींचे आमरण उपोषण सुरू

Next

नांदगाव : तालुक्यातील टाकळी खु व माणिकपुंज येथील आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनी परत मिळाव्या या मागणी साठी नऊ आदिवासी आमरण उपोषणास बसले असून त्यात सात महिलांचा समावेश आहे. तालुक्यातील टाकळी खु गट नं ११९ व माणिकपुंज गणेश नगर येथील गट नं ५७ या जमिनी हडप करण्यासाठी तलाठी, सर्कल, व भुमिअभिलेख यांच्या संगनमताने बनावट कागद पञे सादर करु न जमिन झाडपाला करण्याचा प्रयत्न होत असून संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी उपोषणार्थींनी केली आहे. यासाठी चंद्रभागाबाई पवार, रामभाऊ ठाकरे, सुंदरबाई पवार, सुमनबाई माळी, अंजनाबाई नाईक, भावका नाईक, सखूबाई नाईक, काळुबाई नाईक, विमलबाई नाईक हे उपोषणास बसले आहेत. उपोषणास पंचातय समिती सदस्य आशाबाई अहेर यांनी पाठिंबा दिला आहे. नांदगांव तालुका एकलव्यसंघटनेने जाहीर सक्रि य पाठिबा दिला आहे.

Web Title:  Nandgaon tribals continue hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक