नांदगावचा होणार कायापालट, १२ कोटींची कामे प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:29+5:302021-09-16T04:19:29+5:30
स्मशानभूमी ते वडाळकर वस्ती पर्यंतचा रस्ता व पूल दुरुस्ती, दहेगाव धरणाच्या खालच्या बाजूस असलेली पाईप लाईन दुरुस्ती, गुलजार वाडी ...
स्मशानभूमी ते वडाळकर वस्ती पर्यंतचा रस्ता व पूल दुरुस्ती, दहेगाव धरणाच्या खालच्या बाजूस असलेली पाईप लाईन दुरुस्ती, गुलजार वाडी ते भेंडी बाजार नवीन पाईपलाईन, विवेक हॉस्पिटल ते स्मशानभूमी डी.आय. पाईपलाईन, लेंडी नदी ते अब्दुल करीम चाळ, रेल्वे लाईन जवळचा लेंडी नदीवरचा मटन मार्केट पूल व समता मार्ग ते गांधी चौकाकडे जाणारा फरशी पुलास लोखंडी ग्रील बसविणे, शाकांबरी नदीवर सावता कंपाउंड ते नगरपरिषद कार्यालय पुलास लोखंडी ग्रील बसविणे, लेंडी नदीवर असलेल्या दहेगाव धरणालगतची जलवाहिनी दुरुस्त करणे अशी तातडीने करणे आवश्यक असलेली कामे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी प्रस्तावित केली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वरील तातडीची रक्कम उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त कायमस्वरूपी उपाय योजना दोन टप्प्यात करण्यात येणार असून, ब टप्पा लेंडी नदीवरील रेल्वे पूल ते धावले बिल्डिंगपर्यंत ८०० मीटर लांबीची पूर संरक्षक भिंत बांधणे, शाकांबरी नदी व्ही. जे. हायस्कूल ते जैन धर्म शाळेपर्यंत दोन्ही बाजूस संरक्षक भिंत बांधणे, आंबेडकर चौक ते गांधी चौक, फुले चौक-अहिल्यादेवी चौक मार्गे गुलजार वाडी परिसरात रस्ता तयार करणे, अशी पाच कोटींची कामे दुसऱ्या टप्प्यात प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १२ कोटी रुपयांची तातडीची व कायमस्वरूपी कामे भविष्यात पुरामुळे समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आराखड्यात धरण्यात आलेली आहेत. ब व क टप्प्यातील कामे अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी सुमारे दहा कोटींचा निधी नगरविकास खात्याकडून मिळणे अपेक्षित आहे.