करवसुलीअभावी नांदगावी कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:34+5:302021-05-28T04:11:34+5:30
नांदगाव : येथील नगर परिषदेची पावसाळ्यापूर्वीची कामे करवसुलीअभावी ठप्प झाली असून त्यातच मजुरांची टंचाई असल्याने तीन मोठ्या कामांना ब्रेक ...
नांदगाव : येथील नगर परिषदेची पावसाळ्यापूर्वीची कामे करवसुलीअभावी ठप्प झाली असून त्यातच मजुरांची टंचाई असल्याने तीन मोठ्या कामांना ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे शासनाकडून येणाऱ्या निधीलाही कात्री लागली आहे.
नगर परिषद हद्दीत शाकंबरी नदी व लेंडी नदी अशा दोन नद्या असून सन २०१९-२० मध्ये, दोन्ही नद्यांचे पात्र सफाई केलेली आहे. सद्यस्थितीत नगर परिषदेकडे निधी उपलब्ध नाही. सध्या नगर परिषद सफाई कामगारांकडून काम करण्यात येत आहे.
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात सफाईवर ८ लक्ष रुपये खर्च झाला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे करांची वसुली झालेली नाही.
कोरोनामुळे गेल्या वर्षी व आता पावसाळा पूर्व कामांना ब्रेक लागला असून सिटी सर्व्हे नंबर २५२४ पी. वरील भाजी मार्केट व शॉपिंग सेंटरचे उर्वरित काम करणे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत नांदगाव नगर परिषदेच्या मौजे गिरणानगर येथील सर्व्हे नंबर १० या जागेवरील नागरी घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत विविध सिव्हिल कामे करणे वरील सर्व कामे मजुरांची कमतरता असल्याने बंद आहेत. नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. ४ मधील भोलेनगर येथील स्मशानभूमीचा विकास करणे मजुरांची कमतरता असल्याने बंद आहे. नगर परिषद प्रत्येक वर्षी पावसाळा ऋतू सुरू होण्यापूर्वी जुन्या व पडावयास आलेल्या धोकादायक इमारतीधारकांना नगर परिषदेच्या परवानगीने इमारत उतरून घेण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करते. इमारतधारकांकडून अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन इमारत उतरविण्याबाबत परवानगी देते. यंदा २० जुन्या व पडावयास आलेल्या धोकादायक इमारतींच्या कागदपत्रांची पूर्तता करून इमारत उतरवून घेण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे.
पावसाळापूर्व कामांसाठी यंदा निधीची उपलब्धता नाही.
प्रगतिपथावर असलेली कामे
नगर परिषद हद्दीतील नरेंद्र नगर येथे भूमिगत गटारी करून रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. एकनाथ नगर, रामराव कवडे नगर येथे भूमिगत गटारी करून रस्ता येथे कॉंक्रिटीकरण करणे ही कामे १४ वा वित्त आयोग अनुदान अंतर्गत घेतली असून कामे प्रगतिपथावर आहेत.
--------------------
कोरोनामुळे कर वसुली होत नाही. शासनाकडून निधी उपलब्ध झाला तर बरीच कामे मार्गी लावता येतील. उपलब्ध कामगारांकडून पाणी पुरवठा व सफाईची कामे करून घेण्यात येत आहेत.
-निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी, नांदगाव
----------------------
एक वर्ष असेच निघून गेले. आमदारांनी ९.५० कोटींची २८ कामे कामे मंजूर करून आणली. त्याचे टेंडर झाले. आदेश काढण्यासाठी प्रशासकीय व तांत्रिक अडचणी आहेत. कार्यालयीन ५० टक्के उपस्थितीमुळे क्लार्क आहे तर इंजिनिअर नाही. त्यामुळे उशीर होत आहे. गावात ज्यांचे धंदे सुरू आहेत ते व ज्यांचे बंद आहेत ते, अशा दोघांमध्ये वाद आहेत.
- राजेश कवडे, नगराध्यक्ष
(२७ नांदगाव २)
===Photopath===
270521\27nsk_6_27052021_13.jpg
===Caption===
२७ नांदगाव २