नांदगावकर म्हणतात, थांब रे आता पावसा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:47+5:302021-09-27T04:14:47+5:30
इन्फो आजपासून हस्त नक्षत्र सोमवारी (दि. २७) हस्त नक्षत्रास प्रारंभ होत आहे. सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य हस्त ...
इन्फो
आजपासून हस्त नक्षत्र
सोमवारी (दि. २७) हस्त नक्षत्रास प्रारंभ होत आहे. सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांनी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करत असून, या नक्षत्राचे वाहन घोडा आहे. या नक्षत्राचा पाऊस उत्तरार्धात शेवटी बऱ्यापैकी होईल. पण, खंडित स्वरुपात वृष्टीचा योग असल्याचे भाकीत पंचांगकर्त्यांनी वर्तवले आहे. उत्तरा नक्षत्रात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. उत्तरा नक्षत्रात सुमारे १० टक्के पावसाची नोंद झालेली आहे. उत्तरा नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस असल्याने या नक्षत्राची म्हैस पाण्यात मनसोक्त डुंबली.
इन्फो
चांदवड, सिन्नर, दिंडोरीला कमी पाऊस
जिल्ह्यात पाऊस चांगला झालेला असताना चांदवड, सिन्नर व दिंडोरी तालुक्यात अपेक्षित अशा पावसाची नोंद झालेली नाही. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात तर अजूनही बंधारे धडपणे भरलेले नाहीत. चांदवड तालुक्यात सर्वात कमी ४७.७८ टक्के पावसाची नोंद झालेली आहे, तर सिन्नर तालुक्यात ७०.०७ तसेच दिंडोरी तालुक्यात ६९.२१ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. या तीन तालुक्यांना अजूनही पावसाची आस कायम आहे.
फोटो- २६ नांदगाव माणिकपुंज
260921\26nsk_2_26092021_13.jpg
फोटो- २६ नांदगाव माणिकपुंज