‘पोस्टकार्ड पाठवा’ उपक्रमास नांदगावकरांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 09:16 PM2020-06-11T21:16:55+5:302020-06-12T00:33:00+5:30
नांदगाव : ‘पन्नास पैसे खर्च करून पोस्टकार्ड पाठवा आणि आपला हक्क मिळवा’ या ग्राहक संघटनेच्या आवाहनाला व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नांदगाव ग्राहक संघटनेचे प्रदीप थोरात व अभिषक विघे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना सदर पत्रे पाठविण्यात येत आहेत.

लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय चौपट झाले. पानटपरी, सलून, गोळ्या बिस्किटे,
स्टेशनरी कटलरीचे छोटे दुकानदार, मजूर, हातावर पोट असलेले कामगार उद्ध्वस्त झाले आहेत. भरून ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने हा उपक्रम सुरू केला आहे.
----------------------
नवीन लघु व्यवसाय उभे करण्यास पैसे लागणार आहेत. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासनाने विविध प्रकारच्या लघु व्यावसायिकांना दहा हजार रु पयांपर्यंत वेतन द्यावे.
-----------
घेतलेल्या कर्जाचे पुढील हप्ते माफ करावे, व्यवसायासाठी कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात येत आहेत.