नांदगावी ७७ हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Published: June 26, 2017 12:35 AM2017-06-26T00:35:27+5:302017-06-26T00:35:40+5:30

नांदगाव : श्रीरामनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमाराला चोरीच्या तीन वेवेगळ्या घटनांत रहीवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्त्याहत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला

Nandgavi 77 thousand rupees lumpas | नांदगावी ७७ हजारांचा ऐवज लंपास

नांदगावी ७७ हजारांचा ऐवज लंपास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : श्रीरामनगर परिसरात रविवारी पहाटेच्या सुमाराला झालेल्या चोरीच्या तीन वेवेगळ्या घटनांत रहीवाशांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करीत सोन्याच्या दागिन्यांसह एकूण सत्त्याहत्तर हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. परिसरात चोरी झाल्याचे समजताच नागरिक जागे झाले व गस्तीवर असलेल्या पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनस्थळी दाखल होत चोरांचा पाठलाग केला मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे पसार झाले. या घाटनेनंतर पोलिसांनी इतर जिल्ह्यात घटनेची माहिती देत नाकाबंदी करण्यास सांगितले असता नेवासा येथील हद्दीत या घटनेतील दोन संशियतांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याची खात्रीशीर माहिती मिळते. दरम्यान चोरीच्या घटनेच्या माहिती मिळताच श्वान पथक ठसा तज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी माग घेण्याचा प्रयत्न केला.
याबाबत माहिती अशी, येथील मालेगाव रस्त्यावर राहणारे लष्करातील निवृत्त सैनिक बाळासाहेब श्रावण सोनस यांच्या घराच्या किचनचा दरवाजा तोडून चोघे जण आत घुसले व चाकूचा धाक दाखवीत त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन काढली या झटापटीत सोनस यांनी एकाला ढकलून घराबाहेर येत आरडाओरड केली हे बघून चोरट्यांनी लगतच्या श्रीराम नगर भागातील वडमळयात राहणाऱ्या राजेंद्र पाटील यांच्या घराकडे आपला मोर्चा वळविला याठिकाणी त्यांनी राजेंद्र यांच्या पायावर लोखंडी टॉमी मारली व त्यांची पत्नी सुनीता व मुलगी चित्रा यांना मारहाण केली त्यांनतर त्यांनी गुरु कृपानगर भागात राहणाऱ्या जनार्दन कृष्ण पगार यांच्या घराशेजारील एका दुकानाचे शटर तोडले. दरम्यानच्या काळात लष्करातील निवृत्त सैनिक बाळासाहेब सोनास यांनी प्रसंगावधान दाखवीत पोलिसांना फोन केलेला असल्याने पोलिसांनी खासगी वाहनाने जाऊन चोरांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे मांडवाडच्या दिशेने पळून गेले. जवळच्या एका टेकडीवर त्यांचे मोबाईल पोलिसांना मिळून आले. दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषनचे निरीक्षक नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी नांदगाव बाहेर जाणाऱ्या सर्व महत्वाच्या रस्त्यावर नाकाबंदी केली तथापि चोरटे जवळच्या आडमार्गाने निसटण्यात यशस्वी झाले.


नेवासा येथे दोन संशयित ताब्यात
नेवासा येथे पहाटेच्या सुमाराला गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी दुचाकीवर येणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असता नांदगावच्या घटनेतील ते संशयित असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा अन्वेशनच्या पथक सोबत गेलेल्या सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब सोनास यांनी त्यांना ओळखले पोलिसांनी त्यांना सायंकाळी ताब्यात घेतले. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण चे किशोर नवले नांदगावचे पोलीस निरीक्षक अरु ण निकम आदींच्या पथकाने हि कामिगरी केली.

Web Title: Nandgavi 77 thousand rupees lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.