नांदगावी धनगर समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:27 AM2018-12-04T00:27:26+5:302018-12-04T00:27:43+5:30
नांदगाव : येथील तहसील कचेरीवर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढला व निवेदन दिले. शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चेकरांनी आरक्षणाच्या संदर्भातील मागणी केली व निवडणूक काळात महायुतीने काढलेल्या वचननाम्याची होळी केली.
नांदगाव : येथील तहसील कचेरीवर धनगर समाजाने आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढला व निवेदन दिले.
शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चेकरांनी आरक्षणाच्या संदर्भातील मागणी केली व निवडणूक काळात महायुतीने काढलेल्या वचननाम्याची होळी केली.
सकाळी ११ वा. राज्यभरात एकाच वेळी महायुतीच्या वचननाम्याची होळी करून हे आंदोलन करण्यात आले. सरकारने विनाविलंब वचनपूर्ती केली नाही तर गंभीर परिणाम होतील, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे, सुनील सोर, डॉ. गणेश सोनवणे, शरद आयनोर, आशुतोष शिंगाडे, संजय शिंगाडे, वाल्मीक वर्पे, बिरू देवकते, संजय देवकते, रवि शिंदे, विशाल सोर, गंगाधर करनर, रमेश सोर, झुंजार करनर, महेश खांडेकर, व्हणाजी खरात, नंदू गुमनर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.