नांदगावी नागोबाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:46 PM2018-08-19T16:46:42+5:302018-08-19T16:46:56+5:30
नांदगांव : जतपुरा साकोरा रोडलगत दत्तू बोरसे यांच्या विहिरीत काही दिवसांपासून साडेपाच फूट लांबीचा कोब्रा (नाग) पाण्यात होता. सर्पमित्र विजय बडोदे यांनी युक्तीने त्याला पकडून त्याचा जीव वाचविला.
Next
ठळक मुद्देअधूनमधून पाण्याच्या पृष्ठभागावर येणाऱ्या त्या नागाला बघून शेतकरी कुटुंब घाबरत
नांदगांव : जतपुरा साकोरा रोडलगत दत्तू बोरसे यांच्या विहिरीत काही दिवसांपासून साडेपाच फूट लांबीचा कोब्रा (नाग) पाण्यात होता. सर्पमित्र विजय बडोदे यांनी युक्तीने त्याला पकडून त्याचा जीव वाचविला.
अधूनमधून पाण्याच्या पृष्ठभागावर येणाऱ्या त्या नागाला बघून शेतकरी कुटुंब घाबरत; पण त्याला वरती येता येत नाही अशी खात्री झाल्यावर त्यांनी सर्पमित्र बडोदे यांना बोलावले. नागाला इजा होऊ न देता त्यांनी काटेरी झुडपावरून त्याला अलगद वर काढले तेव्हा तो अशक्त झाला होता. नंतर वनविभागात नोंद करून त्याला जंगलात सोडण्यात आले.
(१९ नांदगांव कोब्रा)