थंडीने नाशिककर गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 02:02 AM2018-12-31T02:02:14+5:302018-12-31T02:04:52+5:30

थंडीचा कडाका शहरासह जिल्ह्यात कायम असून, शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.३०) किमान तापमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला असला तरी कमाल तापमानाने पंचविशी गाठली असल्याने रविवारी दिवसभर थंड वारे वेगाने वाहत होते. परिणामी वातावरणात गारठा कायम राहिल्याचा अनुभव नाशिककरांना आला. रविवारी किमान तापमान ७ अंश इतके नोंदविले गेले. निफाडचा पारा थेट २.८ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.

Nandikar is cold and cold | थंडीने नाशिककर गारठले

थंडीने नाशिककर गारठले

Next
ठळक मुद्देहुडहुडी : तापमानाचा पारा ७ अंशांवर बाजारपेठांमधील गर्दी रोडावली रविवार ठरला कोल्ड‘वार’

नाशिक : थंडीचा कडाका शहरासह जिल्ह्यात कायम असून, शनिवारच्या तुलनेत रविवारी (दि.३०) किमान तापमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला असला तरी कमाल तापमानाने पंचविशी गाठली असल्याने रविवारी दिवसभर थंड वारे वेगाने वाहत होते. परिणामी वातावरणात गारठा कायम राहिल्याचा अनुभव नाशिककरांना आला. रविवारी किमान तापमान ७ अंश इतके नोंदविले गेले. निफाडचा पारा थेट २.८ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली.
जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारत गारठला असून, त्याचा प्रभाव उत्तर महाराष्टÑावरही झाला आहे. विदर्भामधील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, औरंगाबाद ही सगळी शहरे गारठली आहेत. महाबळेश्वरमध्ये पारा १० अंशांपर्यंत घसरला असून नाशिक, मालेगावमध्ये ७ अंश इतके तापमान रविवारी नोंदविले गेले. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिकच वाढला आहे.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात किमान तापमानाचा पारा पाच अंशांपर्यंत घसरला होता. ११ जानेवारी २०१७ रोजी ५.८ इतके नीचांकी तापमान त्या हंगामात नोंदविले गेले होते. मात्र चालू वर्षी डिसेंबरअखेर पारा ५ अंशांपर्यंत घसरला. निफाड तालुका रविवारी संपूर्णत: गोठला होता.
सुटी असूनही बाजारपेठा ओस
नाशकात बोचºया वाºयांनी कुडकुडणाºया नागरिकांना दिवसाही घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने सायंकाळनंतर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला होता. रविवारची सुटी असूनही नागरिकांनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही.
दिवसभर बोचरी थंडी
दिवसभर नागरिकांना बोचºया थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. मागील चार ते पाच दिवसांपासून थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंत घसरल्याची नोंद शनिवारी झाली. ५.१ अंश ही या हंगामातील नीचांकी नोंद ठरली.
जॉगिंग ट्रॅकवरही गर्दी कमी
िदवसभर वातावरणात गारठा कायम होता. तसेच थंड वाºयाचा वेगदेखील अधिक राहिल्यामुळे दिवसभर ऊन पडून न पडल्यासारखेच होते. परिणामी वातावरणात उष्मा निर्माण होऊ शकला नाही. सूर्यास्तानंतर पुन्हा थंड वारे अधिक वेगाने वाहू लागल्याने मध्यरात्रीपर्यंत थंडीचा कडाका अधिकच वाढला होता. रविवारी पहाटे नागरिकांनी घरबाहेर पडणे पसंत केले नाही. परिणामी जॉगिंग ट्रॅकवरील संख्या रोडावल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Web Title: Nandikar is cold and cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.