मानवी साखळीने नंदिनी नदी स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:04+5:302021-06-06T04:12:04+5:30
नंदिनी नदीला प्रदूषण व अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून नंदिनी नदीने मोकळा श्वास घ्यावा, गतवैभव प्राप्त करून नाशिककरांसाठी आकर्षण केंद्र ...
नंदिनी नदीला प्रदूषण व अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर काढून नंदिनी नदीने मोकळा श्वास घ्यावा, गतवैभव प्राप्त करून नाशिककरांसाठी आकर्षण केंद्र व्हावे यासाठी भाजपा पर्यावरण मंचच्यावतीने स्वच्छता व सुशोभिकरणासाठी मोहीम हाती घेतली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पिंपळगाव बहुला ते आयटीआय पुलापर्यंत सातपूर विभागातील भाजपा नगरसेवक तसेच सातपूर मंडलातील पदाधिकाऱ्यांनी
मानवी साखळी करून हातात फलक धरून स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, दिनकर पाटील, इंदूबाई नागरे, रवींद्र धिवरे, विक्रम नागरे, अमोल ईघे, रामहरी संभेराव, संजय राऊत, शिवाजी शहाणे, रवींद्र जोशी, मंगल खोटरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो ०५ भाजप) नंदिनी नदीपात्रात घाण टाकणाऱ्या नागरिकास स्वच्छतेचा संदेश देतांना नगरसेवक शशिकांत जाधव, माधुरी बोलकर समवेत रामहरी संभेराव, मंगल खोटरे, शिवाजी शहाणे, गौरव बोडके, गणेश बोलकर, पांडुरंग खोटरे आदींसह भाजपा कार्यकर्ते.