नंदीश्वरदीप अष्टहनिका पर्वास प्रारंभ
By admin | Published: July 8, 2017 01:10 AM2017-07-08T01:10:37+5:302017-07-08T01:10:52+5:30
देवळाली कॅम्प : दिगंबर जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट येथे श्री नंदीश्वरद्वीप अष्टहनिका पर्वास प्रारंभ झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळाली कॅम्प : देवळालीतील दिगंबर जैन बांधवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या कानजी स्वामी स्मारक ट्रस्ट येथे श्री नंदीश्वरद्वीप अष्टहनिका पर्वास प्रारंभ झाला असून, यानिमित्त विविध ठिकाणांहून सुमारे ५०० हून अधिक भाविक या पर्वासाठी देवळालीत दाखल झाले आहे.
स्व. संतलाल कवी यांच्या सिद्धचक्रविधान या ग्रंथानुसार या अष्टहनिका महापर्वास प्रारंभ करण्यात आला आहे. यानिमित्त मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात आदि भागातून ५०० हून अधिक दिगंबर जैन भाविक सहभागी झाले आहेत. सिद्धचक्रविधान पंडित मुकेश जैन शास्त्री, सुनील धवल, अनिल धवल, दीपक धवल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. आठ दिवस पंडित राजकुमार जैन यांचे ‘आत्मा’ (समयसार) या विषयावर प्रवचन होत आहे. मुंबई दिगंबर जैन सेवा समितीच्या वतीने डॉ. सुभाष चांदीवाल, कैलास छावडा, पदम काला, शांतीलाल कासलीवाल व यासीन समितीचे पदाधिकारी व सदस्यांसह देवळाली कॅम्प परिसरातील भाविक कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहे.