नांदूर-मानूरच्या शेतकऱ्यांचा हरित विकास क्षेत्राला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:51 PM2019-01-22T23:51:30+5:302019-01-22T23:51:51+5:30
स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना मखमलाबाद येथे होत नसेल तर हा प्रकल्प मानूर येथे राबविण्याची उपसूचना नगरसेवकांनी केली असली तरी स्थानिक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असून, पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतकºयांनी या प्रकल्पाला विरोधाचा सूर आळवला आहे.
आडगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना मखमलाबाद येथे होत नसेल तर हा प्रकल्प मानूर येथे राबविण्याची उपसूचना नगरसेवकांनी केली असली तरी स्थानिक शेतकरी याबाबत अनभिज्ञ असून, पिवळ्या पट्ट्यात असलेल्या शेतकºयांनी या प्रकल्पाला विरोधाचा सूर आळवला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत मानूर शिवारात हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) योजना येथे राबविण्याची उपसूचना भाजप नगरसेवक उद्धव निमसे यांनी मांडली आहे. नांदूर व मानूर येथील कोणत्या जमिनींवर हा प्रकल्प कसा राबविला जाणार याबाबत शेतकºयांना काहीच माहिती नसून, नुकत्याच विकास आराखड्यात पिवळ्या पट्ट्यात समाविष्ट करण्यात आलेल्या शेतकºयांचा या योजनेला विरोध आहे.
या संदर्भात काही शेतकºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी हॉटेल जत्रा ते नांदूर रस्त्यामुळे या परिसराचा विकास झाला असून, या भागात शेती व शेतीपूरक व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू आहे. शिवाय विकास आराखड्यात येथील जमिनींचा पिवळ्या पट्ट्यात समावेश झाल्यामुळे शेतजमिनींना सोन्याचे मोल आले आहे.
अशा परिस्थितीत हरित विकास क्षेत्रासाठी जमिनी कशा देणार असे, मत त्यांनी व्यक्त केले. तर हिरव्या पट्ट्यातील जमिनीवर हरित क्षेत्र विकास योजना राबविणार असतील तर शेतकरी विरोध करणार नाही, असे मतही व्यक्त करण्यात आले. काहींनी याबाबत शेतकºयांना अगोदर विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
ग्रीन फिल्ड योजनेबाबत अजून कोणतीही माहिती नाही पण आमच्या वडिलोपार्जित शेतजमिनी आहेत, शिवाय नुकत्याच आमच्या शेतजमिनींचा विकास आराखड्यात पिवळ्या पट्ट्यात समावेश करण्यात आला असल्याने शेती सुरू आहे त्यामुळे आमच्या शेत जमिनींवर कुठल्याही प्रकारची योजना राबविली जाऊ नये. - प्रकाश माळोदे, शेतकरी
स्मार्ट सिटी योजनेबाबत अजून कुठलीही माहिती नाही, पण या परिसराच्या विकासात भर पडणारी शेतकºयांच्या हिताची योजना असल्यास आमचा पाठिंबा असेल, पण अजून आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. शिवाय नगरसेवकांनीदेखील काही माहिती दिलेली नाही. - दिगंबर माळोदे, शेतकरी