नांदूरमधमेश्वर येथे डोहात बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:18 AM2018-07-28T01:18:34+5:302018-07-28T01:18:48+5:30
निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास गुरुपौर्णिमा-निमित्त धरणाजवळील गंगामधमेश्वर मंदिराजवळील डोहामध्ये स्नानासाठी गेलेल्या तरु णाचा बुडून मृत्यू झाला.
सायखेडा/चांदोरी : निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास गुरुपौर्णिमा-निमित्त धरणाजवळील गंगामधमेश्वर मंदिराजवळील डोहामध्ये स्नानासाठी गेलेल्या तरु णाचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी गुरु पौर्णिमा असल्याने ऋ षिकेश काशीनाथ जगताप (२४), रा. धारणगाव वीर, ता. निफाड हा पत्नीसमवेत नांदूरमधमेश्वर येथे आले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास अंघोळीसाठी धरणाजवळील डोहात उतरण्याच्या प्रयत्नात ऋषिकेश याचा पाय घासल्याने तो बुडाला. ही गोष्ट काठावर उभ्या असलेल्या पत्नीच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केल्याने जवळ शेतातीले कामगार व मासेमारी करणाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. डोहात जास्त पाणी असल्याने तत्काळ शोध लागला नाही. सायंकाळी उशिरा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास खानगाव येथील आपत्कालीन पथकाला यश आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे तसेच खानगाव थडी, नांदूमधमेश्वर येथील पोलीसपाटील आणि पोलीस कर्मचारी तळ ठोकून होते.