आरोग्य केंद्राला लावले नांदुरी ग्रामस्थांनी कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 10:43 PM2019-11-03T22:43:42+5:302019-11-03T22:50:13+5:30

कळवण : तालुक्यातील नांदुरी येथे बसस्थानकासमोर दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक महिला जखमी झाल्याने अपघातग्रस्त महिलेला नांदूरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु दवाखान्यात कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करु न प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.

Nanduri villagers lock in health center | आरोग्य केंद्राला लावले नांदुरी ग्रामस्थांनी कुलूप

आरोग्य केंद्राला लावले नांदुरी ग्रामस्थांनी कुलूप

Next
ठळक मुद्देकळवण : वैद्यकीय अधिकारी नसल्यानेनागरीक संतप्त

कळवण : तालुक्यातील नांदुरी येथे बसस्थानकासमोर दुचाकीचा अपघात होऊन त्यात एक महिला जखमी झाल्याने अपघातग्रस्त महिलेला नांदूरी येथील आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु दवाखान्यात कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त करु न प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.
दरम्यान वैद्यकीय अधिकारी व इतर यंत्रणा नसल्याने उपस्थित दोघा शिपाईनी जखमी महिलेवर प्राथमिक उपचार करु न कर्तव्य पार पाडले. सकाळी घटना घडल्यानंतर सप्तशृंगी गडावरील माजी सरपंच संदीप बेनके यांना नाना सदगीर यांनी मोबाईलद्वारे माहिती दिली.
संदीप बेनके यांनी वैद्यकीय यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आल्याने कळवणचे आमदार नितीन पवार यांना भ्रमणध्वनी करु न माहिती दिली. नांदुरी येथील आरोग्य केंद्र फक्त शोभेचे बाहुले बनून उभे असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावा अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी करु न वरिष्ठ यंत्रणेशी संवाद साधतं वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात थांबत नसतील आणि रु ग्णाचे हाल होत असतील तर असे आरोग्य केंद्रच बंद करा अशी सूचना करु न तालुक्यात निष्काळजीपणा झाल्यास कारवाई करण्यास गय करणार नाही असा इशारा आमदार पवारांनी वरिष्ठाना देत वैद्यकीय अधिकारी तात्काळ नियुक्त करण्याची सूचना केली.
नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १६ अधिकारी व कर्मचारी काम करतात. परंतु प्रत्यक्षात एक दोनच कर्मचारी कार्यरत असतात असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या आरोग्य केंद्राला कुलुप (टाळे) ठोकण्यास आमदार पवार यांनी सांगितले. व जो पर्यंत कायम स्वरु पी वैद्यकीय अधिकारी या केंद्राला मिळत नाही तो पर्यंत ठाळे उघडु नका अशी सूचना केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राला नांदुरीचे माजी सरपंच सुभाष राऊत सप्तशृंगी गडावरील माजी उपसरपंच संदीप बेनके, नाना सदगीर, उत्तम राऊत, जितेंद्र हिरे, देविदास चव्हाण, ताराचंद चौधरी आदींनी प्राथमिक आरोज्य केंद्राला कुलूप ठोकले.
दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे टाळे उघडले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांच्याशी संपर्क साधुन दोन वैद्यकीय अधिकारी तात्काळ बदलुन देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कळवण तालुक्यात आरोग्य यंत्रणा आदिवासी जनतेशी सापत्नक वागणूक देत असल्याच्या तक्र ारी असून यंत्रणा आरोग्य केंद्रात थांबत नसतील आणि रु ग्णाचे हाल होत असतील तर कारवाई करण्यात गय करणार नाही. रु ग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी आपला प्रयत्न राहील.
- आमदार नितीन पवार
नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वारंवार असा प्रकार घडत असुन सप्तशृंग घाटात अनेकदा लहान मोठे, अपघात घडत असतात व मी स्वत: जखमी रु ग्णांना या दवाखान्यात घेऊन येतो. परंतु याठिकाणी वैद्यकीय अधिकारी राहत नसल्याचे निदर्शनास आले असुन परीचारक उपचार व औषधे देतात यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
- संदिप बेनके, सप्तशृंगगड.
नांदुरी प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत अनेक तक्र ारी आल्या असुन या बाबत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही लेखी व तोंडी स्वरु पात तक्र ार केली असुन आम्ही वैद्यकीय अधिकाºयांनी शेरेबुकावरही याबाबत नोंद केली आहे. ते शेरेबुकही नांदुरी आरोग्य केंद्रातून गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.
--डॉ. सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, कळवण.
 

Web Title: Nanduri villagers lock in health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.