नांदुरकीचीवाडी ग्रामस्थांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदाच वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 05:51 PM2018-11-07T17:51:36+5:302018-11-07T17:51:49+5:30

सिन्नर : सिन्नर मतदार संघातील शेवटचे टोकाच्या आंबेवाडी शिवारातील नांदुरकीचीवाडी या अती दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचलेली नव्हती. तीन वर्षे पाठपुरावा करून आता ११० पोलद्वारे ७१ वर्षानंतर २६ घरांत वीज पुरवठा सुरु केला. वाडीवरील ग्रामस्थांनी यंदा प्रथमच उजेडात दिवाळी साजरी केली.

Nandurkichiwadi villagers for the first time power on Diwali eve | नांदुरकीचीवाडी ग्रामस्थांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदाच वीज

नांदुरकीचीवाडी ग्रामस्थांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला पहिल्यांदाच वीज

googlenewsNext

सिन्नर : सिन्नर मतदार संघातील शेवटचे टोकाच्या आंबेवाडी शिवारातील नांदुरकीचीवाडी या अती दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचलेली नव्हती. तीन वर्षे पाठपुरावा करून आता ११० पोलद्वारे ७१ वर्षानंतर २६ घरांत वीज पुरवठा सुरु केला. वाडीवरील ग्रामस्थांनी यंदा प्रथमच उजेडात दिवाळी साजरी केली.
सौभाग्य योजनेतून २६ कुटुंबांना मोफत वीज जोडणीही देण्यात आली. मीटर, सात वॅटचा एलईडी बल्पही देण्याचे काम पूर्ण झाले. दोन दिवसात पथदीप लागणार आहेत. त्यामुळे वाडीवरील ग्रामस्थांनी आज खरी दिवाळी असल्याच्या प्रतिक्रीया यावेळी दिल्या. ‘आमदार यांच्यामुळे आम्हाला वीज मिळाली’ अशा भावना व्यक्त करत अनेकांचे मन भारावून आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी धाणगाव, पिंपळगाव घाडगा, टाकेद, कडवदरा, खेड आदी गावांतील ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. वाडीकडे जाण्यासाठी जंगलातून तीन किलोमीटरचा मार्ग दाट झाडीतून जातो. त्यामुळे ही वाडी विकासासाठी वंचीत होती

Web Title: Nandurkichiwadi villagers for the first time power on Diwali eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.