नांदूरमधमेश्वर धरणात तरु ण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:02 AM2018-02-14T01:02:09+5:302018-02-14T01:02:59+5:30
सायखेडा : नांदूरमधमेश्वर येथे शिवरात्रीनिमित्त यात्रेसाठी आलेला युवक अजय ऊर्फ पप्पू मधुसूदन सांगळे (२९, तळवाडे, ता. निफाड) मंगळवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नांदूरमधमेश्वर धरणात बुडाल्याची घटना घडली. रात्री उशिरा त्याच्या मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले़

पप्पू सांगळे व त्याचे मित्र शिवरात्रीनिमित्त नांदूरमधमेश्वर येथे यात्रेसाठी आले होते. दर्शन आटोपून ते धरणाजवळ फिरायला गेले होते.
आंघोळ करण्यासाठी ते पाण्यात उतरले असता पप्पू सांगळे खोल पाण्यात गेला. खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. घटना समजल्यानंतर निफाडचे प्रभारी तहसीलदार आवळकंठी यांनी घटनास्थळी भेट दिली.
पप्पू सांगळे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा व १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे. तळवाडेचे माजी सरपंच मधुसूदन सांगळे
यांचा मुलगा, तर विद्यमान सरपंच लता राजेंद्र सांगळे यांचा तो पुतण्या होत.