नांदूरशिंगोटे गाव चार दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 10:55 PM2020-04-14T22:55:38+5:302020-04-15T00:05:36+5:30

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) चार दिवस पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. दवाखाने व मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Nandurshingte village closed for four days | नांदूरशिंगोटे गाव चार दिवस बंद

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील रेणुकामाता मंदिरासमोर गोल्डन गेटजवळ बांबू लावून रस्ता बंद करण्यात आला आहे.

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्ग : ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) चार दिवस पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. दवाखाने व मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन भयभीत झाले आहे; मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तहसीलदार राहुल कोताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, मंडळ अधिकारी यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून सलग चार दिवस नांदूरशिंगोटे गाव १०० टक्के लॉकडाउन ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत गावातील एकही नागरिक अनावश्यकरीत्या घराबाहेर पडणार नाही. दूध संकलन केंद्रे, याशिवाय किराणा दुकान, खत दुकाने, भाजीपाला विक्री, पीठगिरणीदेखील बंद राहणार आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेशी निगडित आस्थापना सुरू राहील, असे सरपंच गोपाल शेळक यांनी घोषित केले आहे. शासनाने लॉकडाउनचे कालावधी वाढवून दिला याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात असली तरी गंभीर आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनावश्यकरीत्या घराबाहेर पडणे प्रत्येकाने स्वत:हून टाळले पाहिजे. ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रुपये दंड व संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले. सरपंच गोपाल शेळके, सभापती शोभा बर्के, उपसरपंच विद्या भाबड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास काळे, लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप भाबड, माजी उपसरपंच भारत दराडे यांच्यासह व्यापारी संघटना प्रतिनिधी, आरोग्यसेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत १०० टक्के लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला.
गावात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली होती. तसेच गल्लीबोळात टोळीने बसणाºयांची संख्या मोठी होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील प्रमुख रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने मंगळवारी सकाळी मुख्य रस्त्यावर बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. तसेच नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्राचे अधिकार्यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Nandurshingte village closed for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.