नांदूरशिंगोटेत रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:29 PM2017-10-01T23:29:52+5:302017-10-02T00:09:45+5:30
सिन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया व परिसराचे लक्ष लागून असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने जनसेवा, नम्रता, क्र ांती व अपक्ष यांच्याते लढत होत आहे. गाव पातळीवर प्रथमच प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया व परिसराचे लक्ष लागून असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने जनसेवा, नम्रता, क्र ांती व अपक्ष यांच्याते लढत होत आहे. गाव पातळीवर प्रथमच प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर व जिल्ह्याच्या सरहद्दीवरील शेवटचे गाव तसेच परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नांदूरशिंगोटे गावाची ओळख आहे. थेट जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने यावेळी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.या निवडणुकीत प्रथमच सरपंचपद हे जनतेतून निवडले जाणार असून उमेदवारांनी आपला प्रचार हायटेक केला आहे. ७ आॅक्टोबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. गावात तिन्ही पॅनल तसेच अपक्ष उमेदवारांनी आपापल्या पक्षाची कार्यालये थाटली आहेत. तसेच मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल बॅनर झळकत आहेत. त्यामुळे गावात राजकीय वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी मतदारसंघात गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी थेट सरपंच निवडीमुळे राजकीय संदर्भ बदलेले आहे. फक्त वॉर्डच नव्हे तर आता संपूर्ण गावातील मतदार सांभाळणे हे सरपंचपदाच्या उमेदवारांपुढे आव्हान आहे. त्यातच वार्डातील सदस्यपदाच्या उमेदवारांचेदेखील मन सांभाळण्याची वेळ आल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
प्रथमच सरपंचपदासाठी संपूर्ण गाव मतदान करणार असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारासाठी गाव हा मतदारसंघ झाल्याने घराघरात प्रचारासाठी जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांनी तर संपूर्ण कुटूंबच प्रचारासाठी उतरविले आहेत. वाडी वस्त्यांवर भेटीगाठी सुरु केल्या आहे. वार्डातील सदस्यांचे उमेदवार देखील सरपंच पदाच्या उमेदवाराला मत मागणार असल्याने त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर जनसेवा विकास पॅनलने येथील रेणुका माता मंदिरात नारळ वाढवून प्रचारास सुरवात करुन आघाडी घेतली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाºया नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतसाठी पाच प्रभागात एकूण ४ हजार ५६८ मतदार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत गावच्या राजकारण पहिल्यांदा एकाही गटाला पूर्ण पॅनलची निर्मिती करता आली नाही.
जनसेवा पॅनलने सरपंचसह ११, नम्रता विकासने १० तर क्रांती पॅनलने ४ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंचपदासाठी ६ तर पाच प्रभागातून १३ जागासाठी २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.