नांदूरवैद्यला पिराने पीर दस्तगीर बाबांचा संदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 10:51 PM2020-01-28T22:51:56+5:302020-01-28T22:53:48+5:30

नांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

Nandurwadi Pirne Pir Dastagir Babandan | नांदूरवैद्यला पिराने पीर दस्तगीर बाबांचा संदल

नांदूरवैद्य येथील दस्तगीर बाबांच्या संदल मिरवणुकीमध्ये सहभागी भाविक.

googlenewsNext
ठळक मुद्देगावातून ढोलताशांच्या गजरात अश्वांसह मिरवणूक काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : येथील पिराने पीर दस्तगीर बाबांच्या संदल (उरुस) उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला. ढोलताशाच्या गजरात संदल मिरवणूक काढण्यात आली. येथील दस्तगीर बाबा दर्गाहपासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावर्षीदेखील पाच हजार भाविकांनी येथील दर्गाहवर उपस्थिती देत ‘पिराने पीर दस्तगीर बाबा की जय हो’चा उद्घोष केला. यानिमित्ताने गावातून ढोलताशांच्या गजरात अश्वांसह मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी ढोलपथकांच्या तालावर ठेका धरीत उरुसाचा आनंद साजरा केला. यावेळी भाविकांनी डोक्यावर संदल, फुलांच्या चादरी, गलफ यांची ताटे डोक्यावर घेत ढोलताशांच्या ठेक्यावर विद्युत रोषणाई केलेल्या रथामधून संदलची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे या संदल मिरवणुकीमध्ये नृत्य करणाऱ्या अश्वांनी भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे नृत्य सादर केले. मिरवणूक भैरवनाथ महाराज मंदिराजवळ आल्यानंतर या ठिकाणी अश्वांच्या नृत्याची जुगलबंदीचा कार्यक्र म पार पडला. सुंदर अशा नृत्यविष्कार पाहून उपस्थित भाविक आनंदाने भारावून गेले.
यानंतर मिरवणूक दर्गाहजवळ आल्यानंतर नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांच्या हस्ते व दर्गाह समितीच्या वतीने सुंदर फुलांची चादर चढविण्यात आली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा नांदूरवैद्य दर्गाह समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या मिरवणुकीमध्ये विशेष सहकार्य केलेल्या वाडिवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांचा उपसरपंच पोपटराव दिवटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Nandurwadi Pirne Pir Dastagir Babandan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.