नानेगाव, दोनवाडे, लोहशिंगवेत सरपंच विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:16 AM2021-02-13T04:16:08+5:302021-02-13T04:16:08+5:30
दोनवाडे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. त्यात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली असता सरपंचपदासाठी शैला ...
दोनवाडे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. त्यात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली असता सरपंचपदासाठी शैला अशोकराव ठुबे व उपसरपंचपदासाठी सरिता भाऊसाहेब शिरोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई बोराडे, बाळासाहेब ठुबे यांच्यासह अशोक ठुबे, लक्ष्मण शिरोळे, भाऊसाहेब शिरोळे, त्र्यंबक शिरोळे, शरद शिरोळे, हिरामण ठुबे, संपत वाघ, पप्पू ठुबे, ज्ञानेश्वर शिरोळे, निलेश कांगणे, देवराम वाघ, सोमनाथ बोराडे, रामदास शिरोळे, शंकर बोराडे आदी उपस्थित हेाते.
नानेगाव सरपंचपदी नंदा काळे
नानेगाव ग्रामपंचायतचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने सरपंचपदी नंदा संजय काळे यांची तर उपसरपंचपदी विमल भगवान आडके यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक आडके, काळू आडके, अनिता आडके, आशा मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, वासुदेव पोराजे, संपत बर्डे, भारती शिंदे, वर्षा आडके आदी उपस्थित होते. यावेळी विलास आडके, ज्ञानेश्वर काले, अशोक आडके, शरद रोकडे, सोमनाथ आडके, रामदास शिंदे, विष्णू आडके, मोहन आडके आदींनी जल्लोष साजरा केला.
लोहशिंगवे सरपंचपदी योगीता जुंद्रे
लोहशिंगवे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने सत्तापरिवर्तन केल्याने शेतकरी पॅनलच्या योगीता युवराज जुंद्रे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी रघुनाथ जुंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून विजय चौधरी, ग्रामसेवक उमेश चौधरी यांनी काम बघितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अविनाश वाघचौरे, युवराज जुंद्रे, सुनीता पाटोळे, कविता जुंद्रे, रघुनाथ जुंद्रे, लक्ष्मी माळी, संगीता पाटोळे,
ताराबाई जुंद्रे आदी उपस्थित होते.