नार-पारच्या निविदा लवकरच निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:46 AM2019-02-08T00:46:52+5:302019-02-08T00:48:31+5:30
नांदगाव/कळवण : नार पार नदीजोड प्रकल्पाचे टेंडर लवकरच प्रसिद्धीला दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीदिल्ली येथे दिली. याबाबतचे आदेशही त्यांनी अधिकाºयांना दिले. या प्रकल्पात नांदगाव तालुक्याच्या समावेशाची पुष्टी करण्यात आली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेऊन या प्रकल्पाकडे त्यांचे लक्ष वेधले.

नार-पार गोदावरी उपसा जोड योजनेचे पाणी नाशिक जिल्ह्यासाठी आरक्षित करावे, नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआर बनविण्याचे काम सुरु असून त्यामध्ये गोदावरी तसेच तापी खोरे या दोन्हींची तूट भरून काढण्यासाठी डीपीआरमध्ये त्यांचा समावेश करावा यावर चर्चा झाल्यावर गडकरी यांनी संबंधित अधिकाºयांना तात्काळ सूचना देखील केल्या.
या शिष्टमंडळात नांदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक हनुमंत सानप, हेमंत चंद्रात्रे, योगेश बर्डे, विकास भुताडे, तुकाराम जोंधळे, बापू गायकवाड, बागलाणचे अनंतराव दीक्षित, राजू चव्हाण, मंगेश शिंदे, सोहन चारोस्कर, संतोष आहेर, किशोर झालटे, प्रकाश पगारे आदिंसह मनमाड, नांदगांव, चांदवड, दिंडोरी ,देवळा, निफाड, येवला, पेठ, सुरगाणा, कळवण तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.दुष्काळी तालुक्यांना होणार लाभनाशिक जिल्ह्यातील नार-पार नदीजोड प्रकल्पाअंतर्गत अंदाजे ३ हजार ५०० कोटी रु पयांच्या निधीस मंजूरी मिळाल्यामुळे नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, या तालुक्यांना नदीजोड प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच गिरणा खो-यातील सटाणा, मालेगाव, या तालुक्यांनाही फायदा होणार आहे. तसेच नार गोदावरी उपसा जोड योजना क्र मांक ३ व ४ यातील उपलब्ध होणारे सुमारे ५ टीएमसी पाणी पुणेगाव, किंवा मांजरपाडा क्र १ मध्ये टाकल्यास चांदवड, नांदगाव, येवला या गोदावरी खोºयांतील दुष्काळी तालुक्यांना फायदा होईल असेही गडकरी यांना पटवून दिले.