नार-पार प्रकल्प मार्गी लावणार

By admin | Published: July 17, 2016 01:24 AM2016-07-17T01:24:08+5:302016-07-17T01:24:34+5:30

सुभाष भामरे : सटाणा येथे स्वागत

Nara-crossed project will be implemented | नार-पार प्रकल्प मार्गी लावणार

नार-पार प्रकल्प मार्गी लावणार

Next

सटाणा : तापी खोऱ्याच्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण आता नार-पार प्रकल्प मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्या कामाला केंद्रीय जल मंडळानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे पश्चिमवाहिन्या पूर्व होऊन नाशिक जिल्ह्याच्या उत्तर, पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न सुटून परिसर सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.
डॉ. सुभाष भामरे यांची केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच त्यांचे शनिवारी सायंकाळी बागलाणमध्ये आगमन झाले. बागलाणच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रथम डॉ. भामरे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांची फुलांनी सजवलेल्या गाडीवर ढोलताशाच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुष्पहार घालून डॉ. भामरे यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातील सूर्य लॉन्स येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी डॉ. भामरे यांचा भाजपाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, कोषाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, चिटणीस गजेंद्र चव्हाण, (पान ५ वर)
जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देवरे ,तालुकाध्यक्ष संजय भामरे ,शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे ,विरोधी पक्षनेता साहेबराव सोनवणे ,बिंदुशेठ शर्मा ,निलेश पाकळे ,मंगेश खैरनार यांनी नागरी सत्कार केला.या नागरी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.
या महत्वाकाक्षी प्रकल्पामुळे पश्चिम वाहिन्या पूर्वेकडे वळविण्यात येतील त्यामुळे तापी खोर्याची पाण्याची तुट भरून काढत रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास मदत होणार असल्याचेही म्हणाले.दरम्यान हरणबारीच्या कालव्यांसाठी ?? कोटी रु पयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करून तापी नदीवर तत्कालीन जलसंपदा मंत्री एकनाथराव खडसे यांनी लिफ्ट इरिगेशन योजना प्रस्तावित केली होती त्यामुळे धुळे,नंदुरबार ,जळगाव जिल्ह्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार होता .मात्र आघाडी सरकार खोडा घातल्यामुळे योजनेचा खर्च तेवीसशे कोटीवर गेला आहे.ही योजना आता मार्गी लावण्यात यश आले असून त्याला नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितले .

डॉ.विलास बच्छाव यांनी सटाणा शहरासाठी केळझर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून शहरवासीयांची तहान भागवावी यासाठी डॉ.भामरे यांना साकडे घातले .त्याची मंत्री महोदयांनी विशेष दखल घेत त्या संदर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले .भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव ,रामचंद्रबापू पाटील ,साहेबराव सोनवणे ,अण्णासाहेब सावंत ,दिनेश देवरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्र मास तालुकाध्यक्ष संजय भामरे ,शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे ,भूषण कासलीवाल , डॉ.शेषराव पाटील ,रमेश देवरे ,श्रीधर कोठावदे ,डॉ.प्रशांत पाटील ,डॉ,व्ही.डी.पाटील ,शंकरराव सावंत ,पुष्पलता पाटील ,सरोज चंद्रात्रे ,सुनिता पाटील ,प्रशांत बच्छाव ,प्रकाश सांगळे ,जगदीश मुंडावरे ,पंकज ततार ,अण्णा अिहरे ,दिलीप येवला ,संजय पापडीवाल आदी उपस्थित होते.

Web Title: Nara-crossed project will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.