नारायण नागबली लाखोंच्या उलाढाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:24 AM2022-01-11T00:24:07+5:302022-01-11T00:29:17+5:30

वसंत तिवडे लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : धार्मिक वृत्तीचे व श्रद्धाळू भाविकांमध्ये नारायण नागबली, कालसर्प शांती व त्रिपिंडी श्राद्ध ...

Narayan Nagbali has a turnover of lakhs | नारायण नागबली लाखोंच्या उलाढाली

नारायण नागबली लाखोंच्या उलाढाली

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाकाळात अनेकांची उपाससमार

वसंत तिवडे

लोकमत न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : धार्मिक वृत्तीचे व श्रद्धाळू भाविकांमध्ये नारायण नागबली, कालसर्प शांती व त्रिपिंडी श्राद्ध या विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे विधी केल्यामुळे आपल्या कुटुंबावरील पीडा टळते, अशी श्रद्धा असल्याने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. परिणामी, लाखो रुपयांच्या उलाढाली याठिकाणी होत असतात.

विधीला पाचशे वर्षांची परंपरा
नारायण बली व नागबली हे वेगवेगळे विधी असले तरी फक्त त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रातच हे जोडविधी म्हणजे नारायण नागबली फक्त त्र्यंबकेश्वर नगरीतच होत असतात. विशेष म्हणजे या विधीला किमान पाचशे वर्षांची परंपरा असल्याचे व तसे कागदपत्रे पुरोहितांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. त्रिपिंडीची परंपरा तर रामायण कालापूर्वीची असल्याचा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. भगवान श्रीराम वनवासात असतांना आपल्या पित्याचे पिंडदान त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीत श्रीकुशावर्त तीर्थावर केले असल्याचा उल्लेख स्कंद पुराणात श्लोकाच्या स्वरुपात आहे.

कोरोनाकाळात अनेकांची उपाससमार

दीड-दोन वर्षांपूर्वी कोविडच्या लॉकडाऊन काळात मंदिर बंद असल्याने भाविकांना धार्मिक स्थळी जाण्यापासून रोखण्यात आले होते. परिणामी, केवळ त्र्यंबकेश्वर नाही तर त्र्यंबकच्या पंचक्रोशीतील गावांचे अर्थकारण बंद पडले होते. मंदिर उघडे असल्यावर व धार्मिक विधी सुरू असल्याने संपूर्ण विभागाचे अर्थकारण तथा गोरगरिबांना रोजगाराचे साधनच बंद झाल्याने अनेकांची उपासमार झाली. गरीब लोकच नव्हे तर दस्तुरखुद्द पुरोहित वर्गदेखील त्यावेळेस हवालदिल झाले होते.

पूजेसाठी लागणारे साहित्य
तांब्याचे गडू, तबकड्या, मूर्ती, नवीन कपडे, तांबट यांच्याकडून भांडे, सोनाराकडील मूर्ती, फुलविक्रेत्याकडून फुले, बेल, तुळस, दर्भ पुलाच्या काड्या, समिधा, गोवऱ्या, कणिक, गायीचे तूप, मध, दही, दूध व गोमूत्र (पंचामृत), गंध, हळद, कुंकू, मडके, काळे तीळ, जव विड्याची पाने, सोन्याचा नाग आदी साहित्य परिसरातील आदिवासी बांधव आणतात. बांबूच्या परड्या, टोपल्या तयार करणारे कारागीर. गायीचे दूध, तूप, दही, गोमूत्र, गोवऱ्या हेही शेतकऱ्यांकडून उपलब्ध होते. तसेच पुरोहिताच्या घरून संगम घाटापर्यंत हे सर्व साहित्य एका पाटीच्या हाऱ्यातून डोक्यावर वाहतूक करणारे ब्राह्मण असतात.

 

Web Title: Narayan Nagbali has a turnover of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.