नाशिकमधून नारायण राणे? भुजबळांना देणार शह, शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:05 AM2017-12-12T01:05:00+5:302017-12-12T01:05:10+5:30

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून, नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे

Narayan Rane from Nashik? Bhujbal will give it, Shiv Sena's Vraskaswala reinforcement | नाशिकमधून नारायण राणे? भुजबळांना देणार शह, शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम

नाशिकमधून नारायण राणे? भुजबळांना देणार शह, शिवसेनेच्या वर्चस्वाला लगाम

googlenewsNext

- श्याम बागुल

नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतील एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून, नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आहे. राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरुंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच, शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजपा खेळू पाहात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तूर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने, राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित मांडण्यात येत आहे.
नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला, तरी त्यांच्या महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर भाजपा-सेनेत एकमत झालेले आहे. त्या वेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.
राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यांपासून तुरुंगात असलेले छगन भुजबळ नजीकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांदा भाजपाला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील.
अशा वेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. याशिवाय जिल्ह्यात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने, शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिंमत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

सख्य कामी येणार
नारायण राणे यांचा तसा नाशिकशी घनिष्ठ संबंध असून, येथील राजकीय परिस्थिती त्यांना चांगलीच अवगत आहे. राणे मुख्यमंत्री असताना, त्यांच्याशी सेना-भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाºयांचे चांगले सूत जमले होते. त्यानंतर, त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही हा लोभ कायम होता. राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाचे, तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील कामगार युनियनचे अजूनही लागेबांधे आहेत. अशा परिस्थितीत राणे यांचे नेतृत्व सर्वमान्य होण्याची भाजपाला पुरेपूर खात्री आहे.

Web Title: Narayan Rane from Nashik? Bhujbal will give it, Shiv Sena's Vraskaswala reinforcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.