नारायण राणेंकडून नाशिक मुक्कामी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:25 PM2017-12-26T23:25:04+5:302017-12-27T00:21:47+5:30
दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत्वावर डोळा ठेवून मंगळवारी वेळात वेळ काढून महोत्सवाला भेट दिली असून, या भेटीपेक्षाही नाशिक मुक्कामी त्यांनी भाजपाच्या स्थानिक लोक प्रतिनिधींबरोबरच अन्य पक्षीय सहकाºयांशी केलेले गुप्तगू अधिक महत्त्वाचे ठरले आहे.
नाशिक : दरवर्षीच रत्नसिंधू म्हणजेच नाशकात स्थायिक झालेल्या कोकणवासीयांकडून कोकण महोत्सवाचे आयोजन केले जात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेणाºया माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश व त्यासाठी आवश्यक असलेले विधान परिषद सदस्यत्वावर डोळा ठेवून मंगळवारी वेळात वेळ काढून महोत्सवाला भेट दिली असून, या भेटीपेक्षाही नाशिक मुक्कामी त्यांनी भाजपाच्या स्थानिक लोक प्रतिनिधींबरोबरच अन्य पक्षीय सहकाºयांशी केलेले गुप्तगू अधिक महत्त्वाचे ठरले आहे. नारायण राणे यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सर्वाधिक चर्चा त्यांच्या भाजपा प्रवेशाची झाली, मात्र भाजपाने नाकारल्यामुळे राणे यांनी त्यांच्या स्वत:च्या महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षालाच राज्यात बळकट करण्याचा, त्याचा सशर्त पाठिंबा भाजपाला देण्याची घोषणा केल्यामुळे राणे यांचे भाजपाशी असलेले साटेलोटे लपून राहिलेले नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या समारोपात राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिल्याने यासंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या आहेत. जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळ विस्तारात राणे यांचे भवितव्य निश्चित होणार असून, मंत्रिमंडळात समावेशानंतर सहा महिन्यांत राणे यांना विधीमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राज्यातील सद्यस्थिती पाहता, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ व नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असे दोनच पर्याय निवडून जाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदारांची संख्या आटोपशीर व हाताळणे सोपे असल्याने राणे यांची पसंती आहे, शिवाय भाजपाकडेही राणे यांना निवडून आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौºयावर असताना नारायण राणे यांनीही कोकण महोत्सवाला भेट देण्याच्या निमित्ताने नाशिक वारी केली आहे, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राणे हे हेलिकॉप्टरने नाशिक मुक्कामी येणार होते, परंतु ऐनवेळी तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर रद्द करून राणे यांनी मोटारीने नाशकात येणे पसंत केले.
राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्तीने ठेवली बडदास्त
एका खासगी हॉटेलमध्ये राणे यांचा मुक्काम असला तरी, त्यांची सारी व्यवस्था राष्टवादीशी संंबंधित असलेल्या व्यक्तीने केल्याचे सांगण्यात आले. राणे यांची भेट घेण्यासाठी भाजपाच्या लोकप्रतिनिधींसाठी यापूर्वीच वेळ राखून ठेवण्यात आली. शिवाय अन्य पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे असलेले संबंध पाहता, रात्री उशिरापर्यंत राणे यांच्या भेटीसाठी चोरी, छुप्या पद्धतीने अनेकांनी हॉटेल गाठले आहे.