नारायणबापूनगर : संशयितावर कारवाईची मागणी गुंडगिरीच्या निषेधार्थ रहिवाशांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:22 AM2017-11-13T00:22:04+5:302017-11-13T00:22:50+5:30

जेलरोडच्या नारायणबापूनगर सोसायटीचे कार्यालय पेटवून देणाºया समाजकंटकांना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत रहिवाशांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला.

Narayanbapunagar: Demand for action against suspected rioters by protesting against bullying | नारायणबापूनगर : संशयितावर कारवाईची मागणी गुंडगिरीच्या निषेधार्थ रहिवाशांचे आंदोलन

नारायणबापूनगर : संशयितावर कारवाईची मागणी गुंडगिरीच्या निषेधार्थ रहिवाशांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देआंदोलनात महिला व लहान मुलेदेखील सहभागी बाराशे रहिवासी वास्तव्यास सोसायटी कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न

नाशिकरोड : जेलरोडच्या नारायणबापूनगर सोसायटीचे कार्यालय पेटवून देणाºया समाजकंटकांना पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणी करीत रहिवाशांनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला. या आंदोलनात महिला व लहान मुलेदेखील सहभागी झाले होते.
नाशिकरोडची सर्वांत जुनी व मोठी सोसायटी म्हणून नारायणबापूनगर सोसायटी ओळखली जाते. येथे बाराशे रहिवासी वास्तव्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री सोसायटी कार्यालयाचा दरवाजा गुंडाने पेटवून दिल्याची घटना घडली होती. सोसायटी कार्यालय तिसºयांदा पेटविण्याचा प्रयत्न झाला असून, काही दिवसांपूर्वी परिसरातील रहिवाशांची वाहनेदेखील आधी पेटविण्यात आली होती.
या आंदोलनात सोसायटीचे अध्यक्ष अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सचिव दत्ता शिंदे, खजिनदार सुभाष निरभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष नागरे, रितेश गांगुर्डे, अमोल गायकवाड, रु पाली गवारे, सोनाली मुठाळ, जोगिंदर सोधी, देविदास विधाते, प्रकाश ठाकूर, रमेश इंगळे, बाळासाहेब सांगळे, बी. एस. पाटील, अरूण शेवरे, संजय साळवे, भास्कर झाल्टे, नरेंद्र घोडेकर, ईश्वर देवरे, शंकर बिडलन, राजेंद्र रु पवते, सुधीर भोळे आदी रहिवासी सहभागी झाले होते.

Web Title: Narayanbapunagar: Demand for action against suspected rioters by protesting against bullying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.