नारायणी हॉस्पिटल नाशिककरांच्या सेवेत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:39+5:302021-02-07T04:13:39+5:30
नाशिक : उच्च दर्जाची रुग्णसेवा बहाल करण्याच्या उद्देशाने मुंबई नाका परिसरात अद्ययावत सुविधांनी व अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांनी परिपूर्ण नारायणी ...
नाशिक : उच्च दर्जाची रुग्णसेवा बहाल करण्याच्या उद्देशाने मुंबई नाका परिसरात अद्ययावत सुविधांनी व अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांनी परिपूर्ण नारायणी हॉस्पिटलच्या सेवेस ६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. तब्बल १०० बेडचे हे सुसज्ज हॉस्पिटल मुंबई नाकाजवळील हॉटेल छानच्या मागे श्रीवल्लभ नगर परिसरात साकारण्यात आले आहे.
संचालक डॉ. पंकज राणे, डॉ. गौरी दिवाण, डॉ. देवीकुमार केळकर, डॉ. आनंद दिवाण, डॉ. स्वप्निल साखला, डॉ. मनीष चोकसी, डॉ. अजय जाधव, डॉ. दिनेश जोशी, डॉ. दीपा जोशी, डॉ. मयुरी केळकर, डॉ. प्रियंका जाधव आणि डॉ. मोनाली राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवांची उपलब्धता राहणार असून त्यामध्ये मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, ऑब्स्टेट्रिक्स, गायनॅकॉलॉजी आणि पिडियाट्रिक्स या शाखांचा समावेश राहणार आहे. समग्र दृष्टिकोनातून आयुर्वेद व पंचकर्म यांसह नेफ्रॉलॉजी, न्युरॉलॉजी, ऑन्कॉलॉजी, चेस्ट मेडिसीन यांवरील उपचारांची सुविधा उपलब्ध करून देऊन नाशिक आणि परिसरातील रुग्णांना ‘वन स्टॉप हेल्थकेअर डेस्टिनेशन’ची प्रचिती देण्याचा संकल्प यावेळी संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात आला. हॉस्पिटलमधील सुविधांबाबत माहिती देताना ते म्हणाले, येथे चोवीस तास सेवा उपलब्ध असण्याशिवाय २२ बेडच्या अद्ययावत आयसीयु विभागासह सर्व सुविधांची उपलब्धता राहील. अतिउत्तम मात्र परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा हे नारायणी हॉस्पिटलचे खास वैशिष्ट्य राहणार असल्याचेही डॉक्टरांच्या चमूतर्फे स्पष्ट करण्यात आले. याप्रसंगी डॉ. चंद्रशेखर पेठे, डॉ. अमित कुलकर्णी, डॉ. मुकेश धांडे, डॉ. निखिल भामरे, डॉ. हेमंत बोरसे, डॉ. वैभव निंभोरे, डॉ. तुषार नेमाडे, डॉ. सुरेखा नेमाडे, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. स्वप्नाली सुळे, डॉ. विलास कुशारे, डॉ. ढोके, डॉ. राजेंद्र अकुल आदी उपस्थित होते. (वा.प्र.)