नारायणटेंभीला कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:39 PM2019-01-18T18:39:43+5:302019-01-18T18:40:04+5:30
नारायण बाबाच्या यात्रा उत्सवास गुरु वारपासून दिमाखात प्रारंभ
पिंपळगाव बसवंत : पिंपळगांव शहर परिसरातील नारायण टेंभी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नारायण बाबाच्या यात्रा उत्सवास गुरु वार (दि. १७) पासून दिमाखात प्रारंभ झाला. यात्रा उत्सवानिमित्त शुक्र वारी (दि. १८) कुस्त्यांच्या दंगल पार पडल्या. यात्रेनिमित्त गावात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी भव्य कावड मिरवणूक होऊन,पिंपळगाव पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते नारायण बाबाच्या मूर्तीचा गंगाजल अभिषेक झाला. बाबाची पालखी तसेच सजवलेल्या रथाची मिरवणूक संपन्न होऊन ह.भ प विठ्ठलमहाराज वैजापुरकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्र माचा आनंद भाविकांनी घेतला. सायंकाळी अंजली राजे नाशिककर यांच्या लोकनाट्य तमाशाने रसिकांचे मनोरंजन केले. यावेळी माजी सरपंच अजय गवळी, दिगंबर गवळी,बाळासाहेब गवळी,संजय उन्हाळे,सोपान गवळी,संदीप गवळी,रोहिदास कंक, संदीप गवळी ,बाजीराव गवळी,कमलाकर गवळी आदी उपस्थित होते. पिंपळगाव येथील मुलींनी देखील कुस्ती लढवली. त्यात वैष्णवी पावले,अश्विनी दाभाडे,सुरेखा ठाकरे,रु क्मिणी सगट यांनी पारितोषिके मिळविली.
विजेते कुस्तीपटू
कुणाल शिंदे,प्रतीक गवळी प्रवीण दुधकळे योगेश पारधे,विनायक करंडे,सुनील जाधव,रणजित भालेराव,हनुमान उमक, गोरख धुळे,हरी आंबेकर,वैभव जाळे,विजय गवळी,बाजीराव चाळे, हरी मार्कंड,दत्ता कळसकर,अनिल वाघ,अली पहेलवान,ज्ञानेश्वर साने,सुनील जाधव,अजित मोरे,सुरेश थोरात,गोरख गोफण,अश्विन बोडके यांनी कुस्तीचा फड जिंकत पारितोषिके पटकाविली.