राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी नरेंद्र छाजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 05:55 PM2019-06-10T17:55:04+5:302019-06-10T17:57:30+5:30
लोणावळा येथे झालेल्या राज्य टेबल टेनिस संघटनेच्या निवडणुकीत शिव छत्रपती पुरस्कार विजेते आण िनासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांची राज्य टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्याच बरोबर शिव छत्रपती पुरस्कार विजेते शेखर भंडारी यांची कार्यकारिणी सदस्यपदी तसेच राजेश भरवीरकर यांची असोसिएट सदस्य म्हणून कार्यकारिणीवर बिनविरोध निवड करण्यात आली.

माजी राष्ट्रीय खेळाडू संजय मोडक यांची राज्य मानांकन समिती चेअरमनपदी निवड करण्यात आली. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात नासिकला राज्य संघटनेत स्थान मिळाले. या निवडीबद्दल जिल्हा क्र ीडाधिकारी रविंद्र नाईक, अविनाश खैरनार, संजय होळकर, आनंद खरे, अशोक दुधारे, राजीव शिंदे तसेच अनिल चुंबळे, राधेशाम मुंदडा, नितीन मोडक, राकेश पाटील, सुरेंद्र साळेकर आदींनी कौतूक केले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राजीव बोडस (पुणे) यांची तर सहसचिवपदी प्रकाश तुळपुळे (पुणे) व प्रकाश जसानी (गोंदिया) संजय कडू (रायगड) यांची कोषाध्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
(फोटो १० टेबल टेनिस)