शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 01:52 AM2018-05-05T01:52:45+5:302018-05-05T01:52:45+5:30

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊन तब्बल बारा तास निवडणूक अधिकाऱ्यांनी खल केला.

Narendra Darade's application for Shivsena is valid | शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा अर्ज वैध

शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा अर्ज वैध

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्र पोलिसांनी वेढा नगरपालिकेची घरपट्टी थकीत असल्याचे नमूद करण्यात आले होते

नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होऊन तब्बल बारा तास निवडणूक अधिकाऱ्यांनी खल केला. या आक्षेपावर रात्री ११.३०वा. निवडणूक निर्णय अधिकारी बी. राधाकृष्णन् यांनी निर्णय देत दराडे यांचा अर्ज वैध ठरविला. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते, पदाधिकाºयांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. तो कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सशस्र पोलिसांनी वेढा देत शासकीय कामासाठी आलेल्या अभ्यागतांनाही दंडुके दाखवत पिटाळून लावण्यात धन्यता मानली. शिवसेनेकडून उमेदवारी दाखल करणारे नरेंद्र दराडे यांनी आपला अर्ज ज्या प्रतिज्ञापत्रावर सादर केला ते अर्धवट व चुकीचे असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी नोंदवून लेखी हरकत घेतली होती. त्यात प्रामुख्याने दराडे यांच्यावर येवला नगरपालिकेची घरपट्टी थकीत असल्याचे नमूद करण्यात आले होते. सहाणे यांनी घेतलेली ही हरकत दराडे यांच्या समर्थकांना बाहेर कळताच तिकडे येवल्यात तातडीने सुमारे दीड लाख रु पयांची घरपट्टी भरण्याची प्रक्रि या पार पाडण्यात आली. अशी कोणतीच थकबाकी आपल्यावर नसल्याचा दावा दराडे यांच्या वतीने युक्तिवाद करणाºया वकिलांनी केला मात्र ही घरपट्टी आत्ताच भरण्यात आल्याचे पुरावे आपल्याजवळ असल्याचे सांगून सहाणे यांनी दराडे यांना कायदेशीर कचाट्यात पकडले. त्यासाठी त्यांनी थेट येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती नांदूरकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण करण्यात यावे असा आग्रह धरला. ही मागणी मान्य करीत जिल्हाधिकाºयांनी तात्काळ येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नांदूरकर यांना दराडे यांनी भरलेल्या घरपट्टीबाबतची कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहाण्याचे फर्मान सोडले. त्यामुळे अर्ज छाननीसाठी सहाणे यांनी घेतलेली हरकत तशीच ठेवून जिल्हाधिकाºयांनी पुढील प्रक्रि या सुरू केली. त्यानंतर सहाणे यांनी पुन्हा नव्याने हरकत नोंदवित दराडे यांचा अर्ज अवैध ठरवावा, अशी विनंती केली. हे करीत असताना त्यांनी दराडे यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र उपस्थित केले. निवडणूक अर्ज दाखल करताना सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील कॉलम नंबर ६ मधील तिसºया क्र मांकाचा कॉलम रिकामा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सदरची बाब म्हणजे अर्ज अपूर्ण असल्याची तसेच माहिती दडविण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून या संदर्भातले कायदेशीर निवाडेही त्यांनी सादर केले. सर्वोच्च न्यायालयाने उमेदवाराने भरून द्यायच्या प्रतिज्ञापत्राबाबत दिलेले निकालही त्यांनी सोबत जोडले. शहाणे यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा गैरलागू ठरत असल्याचा युक्तिवाद दराडे यांच्या वतीने करण्यात आला व अशा प्रकारचा कॉलम भरण्याची कुठेही सक्ती नसल्याचा दावा करण्यात आला. या दोन्ही प्रकारच्या तक्र ारींची शहानिशा करून निकाल देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दुपारी ४ वाजेची वेळ दिली. दरम्यान सकाळी ११ वाजता वाजता हा प्रकार घडत असताना अर्ज छाननीसाठी राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातील फारसे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित नव्हते. दराडे यांचा अर्ज धोक्यात आल्याचे समजताच शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. त्यामुळे क्षणार्धात कार्यालयात शिवसैनिक शेकडोच्या संख्येने जमले. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही ग्रुप पाठविल्यानंतर त्यांच्याही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धाव घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यास सुरु वात केली. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय तणाव निर्माण झाला. दुपारी १२ वाजेपासून झालेली गर्दी तशीच कायम राहिली. त्यानंतर ४ वाजता पुन्हा दोन्ही बाजूंनी समर्थक जमा झाल्याचे पाहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक आयुक्त व पोलीस निरीक्षक यांना पाचारण करण्यात आले. काहीवेळातच जिल्हाधिकारी कार्यालयात शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवान तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिसांनी वेढा घातल्याचे पाहून कार्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांमध्ये घबराट निर्माण झाली, तर शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना पोलिसांनी फेटाळून लावली. चार वाजेच्या सुमारास निवडणूक निरीक्षक पराग जैन हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. पुन्हा एकदा कायद्यावर खल करण्यात येऊन रात्री ८ वाजता निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यानच्या काळात अनेक प्रकारच्या अफवा पिकविण्यात आल्या. दराडे यांचा अर्ज बाद ठरला याची चर्चा पसरली, तर दुसरीकडे मंत्रालयातून दबाव आणून दराडे यांचा अर्ज बाद करण्यात आला अशीही चर्चा सुरू झाली. परंतु चार वाजल्यावर ही निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निकाल जाहीर करण्यास वेळ मागून घेतली. रात्री साडेआठ वाजता निकाल देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा उत्सुकता ताणली गेली. दरम्यानच्या काळात निवडणूक अधिकारी व त्यांच्या सहकाºयांनी कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या. यादरम्यान निवडणूक आयोगाचे मार्गदर्शनही मागविण्यात आले; परंतु पुन्हा एकवार रात्री १० वाजता निकाल देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. निकाल ऐकण्यासाठी दोन्ही बाजूंकडून समर्थक व वकिलांनी गर्दी केली होती. अखेरीस रात्री ११.३० वाजता निकाल देण्यात आला. दरम्यान निवडणूक अधिकाºयांच्या या निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी दिली. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. आता खरी लढत शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे व जिल्हा विकास आघाडीचे परवेझ कोकणी यांच्यामध्ये तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Narendra Darade's application for Shivsena is valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.