बळीराजाची दहा हजारांच्या मदतीला ‘नकारघंटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:59 PM2017-08-01T23:59:42+5:302017-08-02T00:07:53+5:30

शासनाने खरिपासाठी तातडीची दहा हजाराची मदत जाहीर केली असून, ही मदत देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ९० हजार शेतकºयांना ९० कोटींचे अनुदानही राज्य शिखर बॅँकेने मंजूर केले आहे. मात्र लाखोंचे कर्ज घेणाºया नाशिकच्या बळीराजाला ही दहा हजारांची तोकडी मदत नकोशी झाली आहे.

'Narkaghanta' to help ten thousand of Baliaraja | बळीराजाची दहा हजारांच्या मदतीला ‘नकारघंटा’

बळीराजाची दहा हजारांच्या मदतीला ‘नकारघंटा’

Next

नाशिक : शासनाने खरिपासाठी तातडीची दहा हजाराची मदत जाहीर केली असून, ही मदत देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र ९० हजार शेतकºयांना ९० कोटींचे अनुदानही राज्य शिखर बॅँकेने मंजूर केले आहे. मात्र लाखोंचे कर्ज घेणाºया नाशिकच्या बळीराजाला ही दहा हजारांची तोकडी मदत नकोशी झाली आहे. त्यामुळेच नव्वद हजार शेतकºयांपैकी अवघ्या शंभर शेतकºयांनी तातडीची दहा हजार मदत मिळण्यासाठी जिल्हा बॅँकेकडे अर्ज केल्याचे वृत्त आहे.
सुरुवातीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या वतीने शेतकºयांना खरीप हंगामासाठी शासनाने जाहीर केलेली मदत देण्यासाठी पैसेच नसल्याचे कारण देत शेतकºयांना ही दहा हजाराची तातडीची मदतही देण्यास नकार दिला होता. त्यामुळे राज्य शिखर बॅँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला तातडीने पात्र असणाºया कर्जदार शेतकºयांची यादी व त्यानुसार दहा हजाराची मदत देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा बॅँकेने दहा हजाराच्या तातडीच्या मदतीसाठी पात्र ठरू शकणाºया ९० हजार शेतकºयांचे प्रस्ताव राज्य शिखर बॅँकेकडे दिले होते. ते सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र ही दहा हजारांची मदत घेण्यास आता जिल्ह्यातील शेतकरी नाखूश असल्याचे त्यांच्या मागणी अर्जाच्या संख्येवरून दिसून येत आहे. जिल्हाभरातून अवघ्या शंभरच्या आसपास शेतकºयांनी ही दहा हजाराची तातडीची मदत मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हे शंभर अर्ज नाशिक येथील राज्य शिखर बॅँकेच्या कार्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यानंतर तत्काळ या शंभर शेतकºयांना प्रत्येकी दहा हजारानुसार दहा लाखांचे कर्ज राज्य शिखर बॅँकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Web Title: 'Narkaghanta' to help ten thousand of Baliaraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.