नारळीकर यांच्यामुळे साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:29+5:302021-02-06T04:23:29+5:30

नाशिक : मराठी वाचकाला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान डॉ. नारळीकर यांनी दिले. त्यांच्या वैचारिक आणि विज्ञानवादी विचारांनी मराठी साहित्याला ...

Narlikar will give a scientific dimension to literature! | नारळीकर यांच्यामुळे साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम !

नारळीकर यांच्यामुळे साहित्याला लाभेल वैज्ञानिक आयाम !

Next

नाशिक : मराठी वाचकाला अवघ्या ब्रह्मांडाचे ज्ञान डॉ. नारळीकर यांनी दिले. त्यांच्या वैचारिक आणि विज्ञानवादी विचारांनी मराठी साहित्याला वैचारिक दिशा देण्याचे कार्य केल्याने त्यांना मिळालेला संमेलनाध्यक्षपदाचा मान हा त्यांचा उचित गौरव आहे. आपणासारखा वैचारिक आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला वैज्ञानिक आयाम देणारे ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये होणाऱ्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी भुजबळ म्हणाले की, विज्ञानात साक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु, विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्त्व देऊन वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे महत्त्वाचे काम डॉ. नारळीकर यांच्या साहित्याने केले असल्याचे सांगून डॉ. नारळीकर यांच्या वैज्ञानिक संशोधनपर कार्याचा आणि साहित्याचा गौरव केला. तसेच आम्ही सर्व नाशिककर आपल्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहोत. आपल्या सुविद्य पत्नी मंगलाताई यांच्यासह आपणास संमेलनासाठी आमंत्रित करीत आहोत. नाशिकमध्ये आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी श्रीमती मंगला नारळीकर, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते.

इन्फो

सर्व भावभावनांच्याही पलीकडे जाऊन विज्ञानातील अद्भुत रहस्ये, मूलभूत तत्त्वे आणि त्याचा मानवी जगण्याशी असलेला कमालीचा उत्कट संबंध मराठी साहित्यप्रांतात अफाट क्षमतेने मांडला आहे. त्यातूनच मराठी साहित्याला एक सशक्त काळाच्या पुढची विलक्षण लखलखीत दिशा देण्याचे काम आपल्या लेखनाने केले आहे. सुमारे पाच दशकांहून अधिक काळ आपल्या लेखनाने मराठी वाचकांना विज्ञानविचारांनी समृद्ध करण्याचे कार्य केले असल्याचे सांगून भुजबळ यांनी डॉ. नारळीकर यांना अधिकृत निमंत्रणपत्र दिले.

फोटो

०४नारळीकर

Web Title: Narlikar will give a scientific dimension to literature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.