साधनेतूनच नर्मदा परिक्रमा साध्य : भांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:20 AM2018-03-22T00:20:57+5:302018-03-22T00:20:57+5:30
नर्मदा परिक्रमा ही साधनेतूनच साध्य होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती, सहनशक्ती, श्रद्धा, समाधानी वृत्ती यातूनच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही परिक्रम करू इच्छिणाऱ्यांनी हे गुण आधी स्वत:त आहेत का ते तपासावे आणि मग परिक्रमेला निर्धास्तपणे निघावे, असे प्रतिपादन बाबा भांड यांनी केले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘नर्मदा परिक्रमा : एक संस्मरणीय प्रवास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
नाशिक : नर्मदा परिक्रमा ही साधनेतूनच साध्य होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती, सहनशक्ती, श्रद्धा, समाधानी वृत्ती यातूनच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही परिक्रम करू इच्छिणाऱ्यांनी हे गुण आधी स्वत:त आहेत का ते तपासावे आणि मग परिक्रमेला निर्धास्तपणे निघावे, असे प्रतिपादन बाबा भांड यांनी केले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ‘नर्मदा परिक्रमा : एक संस्मरणीय प्रवास’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. बाबा भांड पुढे म्हणाले की, आज व्रताला उत्सवाचे स्वरूप आले आहे. पण साधकाचे जीवन जगत नर्मदा परिक्रमा केल्यास तो अनुभव संस्मरणीय ठरतो. नर्मदा स्वत:चे वेगळेपण जपणारी नदी आहे. लांबून ती जरी भीतीदायक वाटत असली तरी तिच्या मार्गावर निघाल्यास आयुष्य समृद्ध होऊन जाते. नर्मदा माता स्वप्नात आल्यानंतर अनेकांशी चर्चा करून, घरसंसाराच्या जबाबदाºया पूर्ण करून मी नर्मदा परिक्रमेवर निघालो. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तीन वेळा अनवाणी पायाने परिक्रमा पूर्ण केली. दरवेळचे अनुभव पराकोटीचा आनंद, समाधान देणारे होते. हे अनुभव जीवनात प्रत्येकाने एकदा तरी घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजनाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. अमर ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. नर्मदा परिक्रमेतील फोटोंचा स्लाईड शोदेखील यावेळी दाखविण्यात आला. याप्रसंगी निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष संजय धोंगडे महाराज, पंडित महाराज कोल्हे, त्र्यंबकदादा गायकवाड आदींसह नागरिक उपस्थित होते. परिक्रमा करण्याची प्रेरणा, त्या दरम्यानचे अनुभव, तेथील लोकजीवन, आध्यात्मिक अनुभूती या सर्व बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यानंतर उपस्थितांनी परिक्रमेविषयी विविध प्रश्न विचारून शंकांचे समाधान करून घेतले.