नॅब हॉस्टेलमधील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:05 PM2018-10-27T22:05:19+5:302018-10-27T22:06:25+5:30
नाशिक : येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्ड अर्थात नॅबच्या हॉस्टेलमधील अल्पवयीन गतिमंद मुलीवर शिपायाने वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित बाळू गजानन धनवटे (५२, रा़ एन/ ५१/एडी/२२९/७ आनंदनगर, सिडको) यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर पी/६६ येथे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्डचे युनिट व कार्यालय आहे़ या कार्यालयात शिपाई पदावर कामावर असलेला बाळू धनवटे हा जुलै २०१८ पासून हॉस्टेलवर असलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीस चॉकलेट खायला देऊन तिच्यावर अतिप्रसंग करीत होता़ तीन-चार दिवसांपूर्वी रिक्षाने जात असताना या मुलीचा धनवटेने लैंगिक छळ केला होता़ दैनंदिन त्रास असह्य झालेल्या या गतिमंद मुलीने तिला अवगत असलेल्या ब्रेल लिपीत तक्रार केली. इतकेच नव्हे तर संशयिताने केलेल्या प्रकरणाबाबत संस्थाचालकांच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रामेश्वर कलंत्री यांच्यासह काही पदाधिकाºयांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ‘त्या’ विशेष मुलीच्या तक्रारीची दखल घेत तिच्या म्हणण्यानुसार फिर्याद दिली़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित धनवटेविरोधात बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल केला आहे़
चाकूने मारण्याची धमकी
संशयित धनवटे हा जुलैपासून अत्याचार करीत असल्याचे समोर आले असून, ही बाब कुणाला सांगितल्यास चाकूने मारून टाकील, अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती़ दरम्यान, नॅबमधील एका मुलीने ही तक्रार केली असून त्याने आणखी काही मुलींवर अत्याचार केले का याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक आऱ सी़ अवतारे तपास करीत आहेत़