नारपारची संजीवनी नांदगावला मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 01:39 AM2018-05-21T01:39:36+5:302018-05-21T01:39:36+5:30
नांदगाव : गेली अनेक दशके पाणीटंचाईच्या झळा सोसताना उंचीच्या समस्येमुळे आपल्याला पाणी मिळूच शकणार नाही, आर्थिकदृष्ट्या तालुका सक्षम होणार नाही, विकासाची गंगा आपल्या दारी येणार नाही अशा नकारात्मक भूतकाळातून नांदगाव तालुका उन्नत भविष्याकडे वाटचाल करू शकणार आहे.. नारपारचे पाणी तालुक्याला संजीवनी देणारे ठरू शकते. ते आले तर पुढच्या पिढ्या सुखी होतील याची जाणीव झाल्याने तालुक्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. गेली दोन- अडीच वर्षे नारपारच्या पाण्याचा पाठपुरावा सुरू ठेवलेल्या नांदगाव तालुका पाणी संघर्ष समितीला केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संजीव धामणे ।

नारपार प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश होण्यासाठी भूपृष्ठ वाहतूक व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला सूचित केले आहे. या संदर्भातील पत्र केंद्रीय जलसंसाधन विभागाचे विशेष अधिकारी यांच्याकडून पाणी संघर्ष समितीचे समाधान पाटील व डॉ. प्रभाकर पवार यांनी मिळविले असून, या लढ्यात सर्वपक्षीयांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील मोरझर परिसरात अत्यल्प पर्जन्यामुळे नागरिकांना स्थलांतराची वेळ आली आहे. पाणी कोठून आणता येईल, पर्जन्य विभाग काही मदत करू शकेल का याचा सन २०१५ पासून समितीने पाठपुरावा सुरू केला. तेव्हा नारपारमध्ये नांदगावचा समावेश करण्यात आलेला नव्हता. विविध शासकीय व प्रशासकीय स्तरावरील लोकांच्या गाठीभेटी घेत असताना नारपार प्रकल्पातून शाश्वत व कमी खर्चात पाणी मिळू शकते याची माहिती पाटील-पवार द्वयींना मिळाली. आंदोलने करून पाणी मागण्याआधी शास्त्रीय माहिती मिळवावी म्हणून अभियांत्रिकी ज्ञान व भौगोलिक चढउतार यांची माहिती संकलित करण्यात आली. आवश्यक नकाशे, समुद्रसपाटीपासूनची उंची यांचे कागद गोळा करत असताना तालुक्याच्या उंबरठ्यावरून दुसरीकडे जाणारा नारपार प्रकल्पाचा कालवा समोर आला. मनमाड अनकाईपासून जाणाऱ्या या कालव्याला टॅप केले तर? त्याची उंची ६२२ मीटर असल्याने व तालुक्यातील धरणे व गावांची उंची त्यापेक्षा कमी असल्याने गुरुत्वाकर्षणाने पाणी येऊ शकते हे स्पष्ट झाले.
नारपारचा डीपीआर बनविण्यासाठी राष्ट्रीय जलनियामक प्राधिकरण, इंटरनशनल कन्सल्टंट इन वॉटर रिसोर्स पॉवर व इंफ्फ्रा. डेव्हलपमेंट या कंपन्या काम करत आहेत. नांदगावचा समावेश डीपीआरमध्ये करण्यात यावा असे केंद्र सरकारचे पत्र राज्य सरकारचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल आणि तापी पाटबंधारे विभाग मंडळाचे कार्यकारी संचालक एस. डी. कुलकर्णी यांना प्राप्त झाले असून, संघर्ष समितीचे पाटील व पवार यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला आहे. डॉ. प्रवीण निकम, उदय पाटील हे त्यांच्यासह होते.तालुक्यात शेती सिंचनाचे प्रमाण फक्त ५ टक्के आहे. येथील खुंटलेल्या विकासात व शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीवरून त्याचे प्रतिबिंब दिसून येते. शेतीसाठी पाणी हा आजपर्यंत केवळ कल्पनाविलासच ठरला आहे. उपलब्ध माहितीनुसार नांदगाव तालुक्याचे दरडोई उत्पन्न आदिवासी तालुक्यांच्या बरोबरीने आहे. ही परिस्थिती नारपारच्या पाण्याने बदलू शकते. प्रशासनातल्या अधिकाºयांनी कालव्याला टॅप करून तालुक्यातील नाग्यासाक्या, दहेगाव, माणिकपुंज, मनमाड शहरासह अनेक छोटी धरणे, नद्या व नाले भरू शकतात याची पुष्टी केली. सध्या तालुक्यात पाणी साठवण क्षमता फक्त १.५ टीएमसी आहे. ती वाढवावी लागणार आहे.