नांदुरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची दगडी भिंत खचली

By admin | Published: August 5, 2016 01:03 AM2016-08-05T01:03:56+5:302016-08-05T01:04:32+5:30

पाटबंधारे विभागाची आदिवासी जनतेला उडवाउडवीची उत्तरे

The narrow wall of the Nanduri small-blockbuster project is destroyed | नांदुरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची दगडी भिंत खचली

नांदुरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची दगडी भिंत खचली

Next

 कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या सप्तशृंगगडावरील जनतेच्या व देवीभक्तांच्या पाणीप्रश्नाची सोडवणूक करणाऱ्या नांदुरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्यालगत असलेली दगडी भिंत खचल्याने या प्रकल्पालगत असलेल्या चिखलीपाडा येथील आदिवासी जनतेमध्ये कमालीची भीती पसरली असल्याने चिखलीपाड्याला प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सांडव्याची भिंत खचली या घटनेचे गांभीर्य ओळखून तक्र ार करणार्या आदिवासी जनतेला पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने याप्रश्नी महसूल, आदिवासी व पाटबंधारे विभागाने लक्ष घालावे अशी मागणी नांदुरीचे जगदीश राऊत व ग्रामस्थ यांनी केली आहे . दरम्यान कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी नांदुरी लघुपाटबंधारे प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली असून भिंत खचल्याच्या वृत्तांला दुजोरा दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेने उडवाउडवीच्या बेजबाबदार विधानाबाबत आदिवासी बांधवांनी आपल्याकडे तक्र ार केली असल्याचे सांगून भिंत खचल्याबाबत संबंधित पाटबंधारे विभागाला तत्काळ लक्ष घालण्याची सूचना केली असल्याचे सांगितले. उर्ध्व गोदावरी प्रकल्प अंतर्गत असलेल्या ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचा नांदुरी लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असून दररोज होणार्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून या लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची भिंत खचला असल्याचे निदर्शनास आल्याने या भागातील आदिवासी बांधवांनी या प्रकल्पाचे शाखा अभियंता नेटावटे
यांना याबाबत कल्पना दिल्याने संबंधित शाखा अभियंत्यांने उडवाउडवीचे उत्तरे देऊन प्रकल्पाच्या भिंतीचे फोटो काढून वृतपत्रात बातमी द्या मग वृतपत्राचे कात्रण करु न प्रस्ताव तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठवू आण िमंजूरी नंतर भिंत बांधकाम करु असे बेजबाबदार विधाने केली असल्याची तक्र ार आदीवासी बांधवानी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The narrow wall of the Nanduri small-blockbuster project is destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.