इंदिरानगर परिसरात वाढले नाष्टा पॉइंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:43 AM2019-05-12T00:43:10+5:302019-05-12T00:43:44+5:30

सकाळी सकाळी गरमागरम भजी, मिसळ यांबरोबर धिरडे, पराठे, पोहे, उपमा, इडली, डोसा यांसारखे घरगुती पदार्थ रस्तोरस्ती मिळू लागले आहेत.

 Nartan Point grew up in Indiranagar area | इंदिरानगर परिसरात वाढले नाष्टा पॉइंट

इंदिरानगर परिसरात वाढले नाष्टा पॉइंट

Next

इंदिरानगर : सकाळी सकाळी गरमागरम भजी, मिसळ यांबरोबर धिरडे, पराठे, पोहे, उपमा, इडली, डोसा यांसारखे घरगुती पदार्थ रस्तोरस्ती मिळू लागले आहेत. शिक्षणासाठी शहरात राहणारे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांची या स्वस्त नाष्ट्याला पसंती मिळू लागल्याने शहरात नाष्टा पॉइंट वाढीस लागले आहेत.
पुणे, मुंबई प्रमाणेच नाशिकमध्येदेखील आता शिक्षणासाठी वास्तव्यास असलेले विद्यार्थी, बदली होऊन आलेले कामगारदेखील एकटेच राहात असल्याने त्यांना अशा नाष्टा पॉइंटचा आधार झाला आहे. सकाळच्या सुमारास चारचाकी वाहन किंवा रस्त्याच्या कडेला टेबल-खुर्च्या मांडून दुकाने चालविली जात आहेत. विशेष म्हणजे घरगुती बनावटीचे सर्व पदार्थ असल्यामुळे ग्राहकांचीदेखील चांगली पसंती मिळत आहे.
शहरात विविध उपनगरांमध्ये विविध अन्य शहरांतून आणि गावातून नोकरी, व्यवसाय व उद्योगासाठी तसेच शिक्षणासाठी युवक-युवती वास्तव्यास आलेले आहेत. भाडेतत्त्वावर राहणाऱ्या या युवकांसाठी तयार नाष्टा उपयुक्त ठरत आहे. सकाळी आणि रात्रीच्या जेवणासाठी मेस लावलेल्यांना मेसच्या ठिकाणी सकाळी सकाळी जावे लागते. सर्वांनाच ते शक्य होत नसल्याने सकाळचा नाष्टा जवळपासच्या हॉटेलमध्येच करावा लागतो. हॉटेलच्या नाष्ट्याला पर्याय म्हणून परिसरात घरगुती नाष्टा पॉइंट सुरू झाल्याने त्यास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सकाळी सात वाजेपासून ते अकरा वाजेपर्यंत नाष्टा पॉइंट सुरू असतात. या दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना एक जोड व्यवसाय मिळाला आहे.
सध्याच्या काळात कुटुंबामध्ये पती-पत्नी दोघेही नोकरी करीत असल्याने स्वयंपाक करण्यासाठी महिलांना घरी पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे नाश्ता सेंटरवर विविध प्रकारचे पदार्थ घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार नाश्त्याचे पदार्थ मिळत असल्याने सर्वच ठिकाणी सकाळपासूनच ग्राहक येत असल्याचे दिसून येते.

Web Title:  Nartan Point grew up in Indiranagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.