नासाका, निसाका भाडेतत्त्वावर देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:44 AM2018-08-05T00:44:52+5:302018-08-05T00:46:26+5:30
नाशिक : जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वारंवार तगादा लावूनही थकबाकी न भरणाऱ्या ५९६ सभासदांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच आगामी गळीत हंगाम लक्षात घेता बॅँकेच्या ताब्यात असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचे ठरविण्यात आले.

जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बँकेच्या विविध शाखांमधून अल्प मुदत, मध्यम मुदत व दीर्घ मुदतीचे थेट कर्ज घेतलेल्या ५९६ सभासदांकडे जूनअखेर १० कोटी २७ लाख मुद्दलाची व ७ कोटी ६० लाखांची व्याजाची थकबाकी झालेली आहे. या थकबाकीदाराकडे कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करूनही रकमेचा भरणा करत नाही. त्यामुळे थेट कर्जाच्या थकबाकी रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यासाठी थकीत थेट कर्जदारा विरोधात फौजदारी कारवाई करणेबाबत चर्चा होऊन कायदेशीर मार्गदर्शन घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या बिगरशेती संस्थांकडे जुनी थकबाकी झाली आहे. अशा संस्थांच्या संचालक मंडळावरदेखील फौजदारी गुन्हे दाखल करणेबाबत निर्णय घेण्यात आला.
बँकेच्या विविध शाखांमार्फत जूनअखेर थकबाकीदार सभासदांविरुद्ध कलम १०१ ची प्रकरणे सहकार खात्याकडे दाखल करून रक्कम वसुलीबाबत पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक व बँकेचे विभागीय अधिकाºयांची प्रधान कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन त्वरित १०१चे दाखले देणेबाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. नासिक सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देणेबाबतची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच निफाड सहकारी कारखाना शासकीय दरानुसार भाडेतत्त्वावर देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात य्२ोणार असल्याची माहिती जिल्हा बॅँकेकडून देण्यात आली.