नासर्डी नदी पूल - वडाळा नाका रस्त्यावर नादुरुस्त वाहनांचा ठिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:20+5:302021-09-23T04:16:20+5:30
सुमारे बारा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला. वाहनांवर नियंत्रण राहावे ...
सुमारे बारा वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नागपूरच्या धर्तीवर वडाळा पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला. वाहनांवर नियंत्रण राहावे म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी पदपथ तयार करण्यात आले, त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शिवाजी वाडी, विनय नगर, साईनाथ नगर, इंदिरा नगर, परब नगर, सार्थक नगर, कला नगर, पांडव नगरी, सराफ नगर, शरयू नगरी, समर्थ नगर, पाथर्डी गावसह विविध उपनगरातील नागरिकांना शहरात ये-जा करण्यासाठी सुरळीत मार्ग तयार झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. नासर्डी नदी पूल ते वडाळा नाका दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यादरम्यान नादुरुस्त वाहने पडून असल्याने वाहतुकीसाठी रस्ता अरुंद पडत आहे. यामुळे अनेक वेळेस वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडत आहेत. संबंधित विभागास तक्रार करूनसुद्धा महापालिका आणि शहर वाहतूक शाखा एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने रस्ता नादुरुस्त वाहनांचे वाहनतळ बनत आहे. तातडीने नादुरुस्त वाहने उचलून संबंधित वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.