ड्रॉप रोबॉल स्पर्धेत नाशिकच्या संघाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:50 PM2018-10-19T12:50:36+5:302018-10-19T12:51:34+5:30
मालेगाव : भारतीय ड्रॉपरोबॉल महासंघ यांच्या मान्यतेने,ड्रॉपरोबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व ड्रॉपरोबॉल असो,आॅफ नाशिक आयोजित नववी राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संदीप कला महाविद्यालय झोडगे (मालेगाव) येथे पार पडल्या.
मालेगाव : भारतीय ड्रॉपरोबॉल महासंघ यांच्या मान्यतेने,ड्रॉपरोबॉल असोसिएशन आॅफ महाराष्ट्र व ड्रॉपरोबॉल असो,आॅफ नाशिक आयोजित नववी राज्यस्तरीय ड्रॉप रोबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संदीप कला महाविद्यालय झोडगे (मालेगाव) येथे पार पडल्या. सदरहू स्पर्धेत राज्यभरातून १४ जिल्हा संघांनी सहभाग घेतला. गटात नाशिक जिल्हा संघाचा सहभाग होता. नाशिक मुलींच्या संघाने सिंगल्स, डबल्स, ट्रीपल्स, व मिक्स डबल्समध्ये धुळे, नगर, जालना या संघांचा पराभव करून बाद फेरीत जळगाव व कोल्हापूर संघाचा पराभव करून राज्यस्पर्धेत द्वितीय क्र मांक मिळविला. या संघातील डे केअर सेंटर शाळेतील खेळाडू सांची रणशुर , श्रावणी मानकर, आदिती जोशी, यश जाधव, नीरज कोईनकर, रितेश नेमाडे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सांची रणशुर हिला ऊत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळाला. विजयी संघाला कल्पना चौहान, बाळासाहेब रणशुर यांचे मार्गदर्शन मिळाले. विजयी खेळाडूंचा सचिव गोपाळ पाटील, अध्यक्ष ल.जि. उगावकर, सहसचिव अंजली पाटील, सदस्य अनिल भंडारी, अजय ब्रह्मेचा, मुख्याध्यापक माधुरी मरवट, शरद गीते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.