नाशिक वसंत व्याख्यानमाला कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:21 AM2018-04-28T01:21:34+5:302018-04-28T01:22:09+5:30

नाशिक वसंत व्याख्यानमालेची सर्वसाधारण सभा होऊन नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी माजी आयुक्त विलास ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.

 NASCAR Vasant lecture executive announces Nashik | नाशिक वसंत व्याख्यानमाला कार्यकारिणी जाहीर

नाशिक वसंत व्याख्यानमाला कार्यकारिणी जाहीर

Next

नाशिक : नाशिक वसंत व्याख्यानमालेची सर्वसाधारण सभा होऊन नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षपदी श्रीकांत बेणी यांची फेरनिवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी माजी आयुक्त विलास ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे.  उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विजय हाके, कार्याध्यक्षपदी चंद्रशेख शहा, चिटणीसपदी संगीता बाफणा, सहचिटणीसपदी शंकर बर्वे, उषा तांबे, खजिनदारपदी अरुण शेंदुर्णीकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून हेमंत देवरे, अ‍ॅड. अजय निकम, अ‍ॅड. दत्त प्रसाद, चैतन्य शहा, सुनील गायकवाड, शरद वाघ यांची निवड करण्यात आली.  अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून अविनाश वाळुंजे, कायदेशीर सल्लागार म्हणून अ‍ॅड. अजय तोष्णिवाल, सल्लागार मंडळात आमदार बाळासाहेब सानप, मधुकर झेंडे, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. प्रदीप पवार, जयप्रकाश जातेगावकर, व्यासपीठ व्यवस्था समितीप्रमुखपदी हिरालाल पदरदेशी, निधी संकलन समिती अनिल नहार, स्वागतसमिती विजय काकड, सोशल मीडिया समिती भूषण काळे, निवास व भोजन समिती श्याम दशपुत्रे यांची निवड करण्यात आली.
मागील इतिवृत्ताचे वाचन संगीता बाफणा यांनी केले. ताळेबंद वाचन अरुण शेंदुर्णीकर यांनी केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
वार्षिक सर्वसाधारण सभा
वसंत व्याख्यानमालेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. अध्यक्षपदासाठी नवल तांबे यांनी मांडलेल्या सूचनेला डॉ. कृष्णा शहाणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी २०१८ ते २०१३ या कालावधीसाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीत यंदा माजी आयुक्त विलास ठाकूर यांची उपाध्यक्षपदी, तर माजी शहर अभियंता सुनील खुने यांची कार्यउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी खर्च आणि अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.

Web Title:  NASCAR Vasant lecture executive announces Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक