सामाजिक बांधिलकी जोपासा : बोधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:40 PM2018-06-30T23:40:20+5:302018-06-30T23:40:59+5:30
नाशिक : संतश्रेष्ठ नामदेव यांनी आयुष्यभर भागवत धर्म तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार व प्रसार केला़ स्वत:करिता केलेले कार्य हे स्वत: पुरते मर्यादित राहते, मात्र तेच कार्य जर समाजासाठी केले तर अमर राहते, मग तो कोणाताही समाज असो़ प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगड येथील उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी केले़
नाशिक : संतश्रेष्ठ नामदेव यांनी आयुष्यभर भागवत धर्म तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार व प्रसार केला़ स्वत:करिता केलेले कार्य हे स्वत: पुरते मर्यादित राहते, मात्र तेच कार्य जर समाजासाठी केले तर अमर राहते, मग तो कोणाताही समाज असो़ प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन रायगड येथील उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे यांनी केले़ नामदेव समाजोन्नती परिषदेतर्फे तूपसाखरे लॉन्स येथे शनिवारी (दि़३०) आयोजित समाजातील मान्यवरांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते़
बोधे पुढे म्हणाले की, यश मिळाल्यानंतर थांबू नका कारण यशानंतर अपयश मिळाले तर टीकेसाठी लोक टपूनच बसलेले असतात़ यश मिळाल्यानंतर आई-वडील, समाज यांना विसरू नका, त्यांना कष्टाने सांभाळ करण्याबाबत मार्गदर्शन केले़ याबरोबरच समाजातील धनिकांनी गरीब व होतकरूसांठी ठराविक रक्कम जमा करून मदत करण्याचे आवाहन केले़ कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड़ सुधीर पिसे यांनी परिषदेचे कार्य व विविध उपक्रमांची माहिती दिली़ यावेळी सीआयडीत निवड झालेले मयूर चांडोले व आयएएस सुरज गणोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला़
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे बाळासाहेब खर्डे, बापूसाहेब वैद्य, मधुकर लचके, सुरज गणोरे, पुरुषोत्तम मुळे, सम्राज्ञी रहाणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी वैदेही खर्डे, सिद्धा बोरकर, साक्षी बेदडे, तनिशा खर्डे, सौरभ गुजर, श्रेया टापसे, मयूर कल्याणकर, अनुजा रहाणे, राधिका गुजर, ऐश्वर्या नेवासकर, मल्लिका राहणे, वैष्णवी नेवासकर, संस्कार नानेगावकर यांचा सत्कार करण्यात आला़ क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनुष्का आंबेकर, स्वराली मुळे, श्रृतकीर्ती चुंबळे, वैष्णवी कोडीलकर यांचाही सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर परिषदेचे उपाध्यक्ष संजीव तूपसाखरे, राजन उरुणकर, चंद्रकांत सारंगधर, डॉ. अजय फुटाणे, संजय नेवासकर, प्रा. एल. जी. दाभोळे, अनंत वायचळ आदी मान्यवर उपस्थित होते़ या कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़