Nashik: भूखंड खरेदीच्या बहाण्याने बारा लाखांची फसवणूक
By नामदेव भोर | Published: May 21, 2023 04:43 PM2023-05-21T16:43:30+5:302023-05-21T16:45:23+5:30
Nashik News: चिंचोली येथील एक भूखंड खरेदी करून नावावर करून देण्याची बतावणी करून दोघा संशयितांनी एका दाम्पत्याची तब्बल १२ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
- नामदेव भोर
नाशिक : चिंचोली येथील एक भूखंड खरेदी करून नावावर करून देण्याची बतावणी करून दोघा संशयितांनी एका दाम्पत्याची तब्बल १२ लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरिश रघुनाथ तायडे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. गिरिश तायडे व त्यांची पत्नी यांचा विश्वास संपादन करून त्यांना चिंचोली येथील एक भूखंड खरेदी करून नावावर करून देण्याची बतावणी करीत संशयित किशोर सिताराम पाटील (४५, शंभू नागेश्वर महादेव मंदिरासमोर , ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) व विश्वास गजानन काजळे(४७, रा.आडगावकर ज्वेलर्स बंगलो, तिडको कॉलनी) चेक व रोख स्वरुपात तब्बल १२ लाख एक हजार रुपये घेतले, मात्र तायडे दाम्पत्याच्या नावावर कोणताही भूखंड नावावर न करून देता त्यांची फसवणूक केली, त्यामुळे तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक नेमाने अधिक तपास करीत आहेत.