नाशिकच्या २३ गावांना लष्करी गोळीबाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:42 PM2018-02-16T15:42:57+5:302018-02-16T15:46:53+5:30

लष्कराकडून नेहमीच गोळीबाराचे तसेच तोफखान्याचे प्रात्याक्षिके सादर केली जात असल्यामुळे त्याची आगावू सुचना लष्करी हद्दीला लागून असलेल्या गावांना दिली जाते. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात

Nashik: 23 villages have the threat of military firing | नाशिकच्या २३ गावांना लष्करी गोळीबाराचा धोका

नाशिकच्या २३ गावांना लष्करी गोळीबाराचा धोका

Next
ठळक मुद्देखबरदारीचा इशारा : दिवसभर संकटनागरिक व जनावरांच्या जिवीताला धोका उद्भवण्याची शक्यता

नाशिक : देवळाली आर्टीलरी स्कूल मार्फत एक्स सेक्टरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लष्कराच्या गोळीबाराचा सराव होणार असल्यामुळे लष्करी हद्दीला लागून असलेल्या इगतपुरी व नाशिक तालुक्यातील २३ गावांतील नागरिक व जनावरांच्या जिवीताला धोका उद्भवण्याची शक्यता लष्कराने वर्तविली आहे.
या संदर्भात अपर जिल्हा दंडाधिका-यांनी नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. लष्कराकडून नेहमीच गोळीबाराचे तसेच तोफखान्याचे प्रात्याक्षिके सादर केली जात असल्यामुळे त्याची आगावू सुचना लष्करी हद्दीला लागून असलेल्या गावांना दिली जाते. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात होणा-या सरावामुळे धोक्याच्या पातळीत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव त-हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, कवाडदरा, समनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदुरवैद्य, टाकेद ब्रुदूक, धामणगाव, नांदगाव बुद्रूक, साकुर दुमला, बेळगाव कुºहे, मालुंजे, गंभीरवाडी, भरविर खुर्द, लहवित, अस्वली आणि नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या गावातील नागरिकांनी धोक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये तसेच स्व:ची जनावरेही या भागात जाऊ देऊ नये. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध मॅन्युव्हर्स फिल्ड फायरिंग अ‍ॅण्ड आर्टीलरी प्रॅक्टीसेस कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Nashik: 23 villages have the threat of military firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.