नाशिक @ ३९.९ : एका दिवसात दोन अंशांनी वाढला पारा
By Admin | Published: May 23, 2017 08:18 PM2017-05-23T20:18:34+5:302017-05-23T20:22:14+5:30
मे महिन्याच्या अखेरीस नाशिककरांना पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.२३) प्रखर ऊन पडल्याने कमाल तपमानाचा पारा पुन्हा चाळिशी जवळ
नाशिक : मे महिन्याच्या अखेरीस नाशिककरांना पुन्हा उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.२३) प्रखर ऊन पडल्याने कमाल तपमानाचा पारा पुन्हा चाळिशी जवळ पोहचला.
दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणामध्ये उष्णता वाढू लागली आहे. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने ३९.९ अंश इतक्या कमाल तपमानाची मंगळवारी नोंद केली. सोमवार कमाल तपमान ३८ अंश इतके नोंदविले गेले होते. एका दिवसात दोन अंशांनी पारा अत्यंत वेगाने चढल्यामुळे नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या. रात्रीदेखील वातावरणात उष्मा जाणवत होता. मे महिन्याचे अखेरचा आठवडा शिल्लक राहिला असून, उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्याने कमाल तपमानात वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे नाशिककर पुन्हा चिंताग्रस्त झाले आहे. पारा चाळिशीपासून केवळ एक अंशाने मागे राहिला.
आठवड्याचे कमाल तपमान
१६ मे - ३७.४
१७ मे - ३६.९
१८ मे - ३७.८
१९ मे - ३७.२
२० मे - ३७.३
२१ मे - ३६.३
२२ मे - ३८.०
२३ मे - ३९.९