नाशकात एकाच दिवशी ५ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 10:30 PM2020-04-18T22:30:57+5:302020-04-19T00:34:40+5:30

नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.

 In Nashik, 3 people were affected in one day | नाशकात एकाच दिवशी ५ जण बाधित

नाशकात एकाच दिवशी ५ जण बाधित

googlenewsNext

नाशिक : नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच एकाच दिवशी ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील चार रुग्ण यापूर्वी आढळलेल्या कोरोनाबाधित वृद्धेच्या कुटुंबातील असल्याने सर्व कुटुंबीय बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याशिवाय अजून एका रुग्णाची भर शहरात तर सिन्नरमध्ये आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.
मालेगावमध्ये तर एका दिवसात तब्बल १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, नाशिक शहरामध्ये सर्वप्रथम आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने हा रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच मालेगावच्या २८ आणि नाशिक मनपा हद्दीतील १७ अशा एकूण ४५ संशयितांचा अहवालदेखील निगेटिव्ह आल्याचा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा नित्यनेमाने वाढत असताना नाशिक शहरातील बाधित रुग्णसंख्या काही दिवसांपासून पाचवरच स्थिरावली होती. त्यामुळे नाशिक शहरात फारशी वाढ होत नसल्याचे काहीसे समाधान नाशिककरांना होते. मात्र, शनिवारी अचानकपणे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने नाशिक शहरातील बाधितांची रुग्णसंख्या थेट दहावर पोहोचली आहे. त्यामुळे नाशिकच्या अन्य तालुक्यांतील चार बाधित रुग्ण आणि मालेगावसह नाशिक येथील एकूण रुग्णसंख्या ९१ पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
नाशिक शहरातील १७ संशयितांचे अहवाल शनिवारी सकाळीच प्राप्त झाले असून, हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शनिवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या मालेगाव आणि नाशिकचे मिळून एकूण ४५ अहवाल निगेटिव्ह, तर नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
---------
मालेगावात पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह
मालेगावातही रात्री १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मालेगावची बाधित संख्या ७७वर पोहोचली आहे. मालेगावचे बहुतांश रुग्ण हे यापूर्वी बाधित ठरलेल्या रुग्णांच्या नातेसंबंधातीलच असल्याचे समजते. शनिवारी आढळलेले पंधरा रुग्ण हे युवा ते मध्यमवयीन गटातील आहेत. दरम्यान, मालेगावच्या संशयितांचे २८ अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
------------------
नाशिकचे कोरोनाबाधित एकाच कुटुंबातील
चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या वृद्धेच्या कुटुंबातील चारही सदस्य कोरोनाबाधित आढळले आहेत. एकाच कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह आढळण्याची नाशिकमधील ही पहिलीच वेळ आहे. चारही पॉझिटिव्ह रुग्ण हे पती-पत्नी आणि दोन मुलगे असल्याने बाधितांच्या परिसरात खळबळ उडाली आहे. त्याशिवाय अन्य एक कोरोनाबाधित हा दुसऱ्या भागातील नागरिक आहे.

Web Title:  In Nashik, 3 people were affected in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक