रात्रभर गॅस शेगडीचं बटन सुरू राहिल्यानं सकाळी उडाला भडका; कुटुंबातील चौघे भाजले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 03:38 PM2020-10-13T15:38:39+5:302020-10-13T15:38:55+5:30

जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

in nashik 4 members of the family injured after gas button remains on for whole night | रात्रभर गॅस शेगडीचं बटन सुरू राहिल्यानं सकाळी उडाला भडका; कुटुंबातील चौघे भाजले

रात्रभर गॅस शेगडीचं बटन सुरू राहिल्यानं सकाळी उडाला भडका; कुटुंबातील चौघे भाजले

Next

नाशिक : शहरातील काठेगल्ली परिसरातील बनकर चौक येथे एका छोट्याशा खोलीत राहणाऱ्या अख्तर कुटुंबियांच्या घरात स्वयंपाकाच्या गॅसची गळती होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात कुटुंबातील चौघे जण  भाजल्याची घटना सोमवारी (दि.13) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बनकर चौकातील शिवनेरी अपार्टमेंट लगत असलेल्या एका छोट्याशा घरातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच घरातून आरडाओरड सुरू झाल्या मुळे आग लागल्याचा संशय नागरिकांना बनवला घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आले माहिती मिळताच शिंगाडा तलाव अग्निशमन मुख्यालयातील लीडींग फायरमन शाम राऊत हे फायरमन किशोर पाटील, विजय शिंदे, राजेंद्र पवार, उदय शिर्के, बंबचालक शरद देटके यांच्यासह घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी भाजलेल्या चौघांना सुरक्षित बाहेर काढत तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. तसेच गॅस सिलिंडर, शेगडीवर पाण्याचा मारा करुन ते सर्वप्रथम घरातून बाहेर काढले. सुमारे अर्धा तास या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न करत आग विझविण्यास जवानांना यश आले. या दुर्घटनेत अली अख्तर (50), रुबिना अख्तर (45), रमजान अख्तर(28), रुखसाना अख्तर (25) हे चौघे जण भाजल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली आहे. अख्तर कुटुंबाचा कांदा, लसूण विक्रीचा व्यवसाय असून घरात कांदा, लसूणच्या गोण्या होत्या. रात्री घरातील महिलेकडून नजरचुकीने गॅस शेगडीचे बटन सुरुच राहिले. यामुळे रातरभर गॅस गळती होत होती, जेव्हा सकाळी उठल्यावर गृहीनीने चहा करण्यासाठी गॅस पेटविला असता भडका उडाला आणि यामध्ये लहान खोलीतील चौघे भाजले.

Web Title: in nashik 4 members of the family injured after gas button remains on for whole night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.