नाशिक @ 7.2; गारठा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 02:43 AM2019-01-01T02:43:54+5:302019-01-01T02:44:23+5:30
पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजेनंतर शहरातील रस्ते ओस पडू लागले होते. ‘थर्टि फर्स्ट’ असूनही रात्री ९ वाजेपर्यंत बाजारपेठा शांत झाल्या होत्या.
नाशिक : पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजेनंतर शहरातील रस्ते ओस पडू लागले होते. ‘थर्टि फर्स्ट’ असूनही रात्री ९ वाजेपर्यंत बाजारपेठा शांत झाल्या होत्या.
थंडीच्या या हंगामात शनिवारी (दि.२९) तापमानाचा पारा थेय ५.१ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककर गारठले होते. हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली आहे. गुरुवारी (दि,२७) पारा ५.७ अंशांवर होता. यामुळे या आठवड्यात थंडीचा कडाका हंगामात सर्वाधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. थंडीची तीव्रता सोमवारी काहीसी कमी जाणवली असली तरी किमान तापमान अद्यापही दहा अंशांच्या खाली असल्यामुळे हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. नागरिकांना संध्याकाळपासूनच हुडहुडी भरली होती. तसेच पहाटेदेखील नेहमीच्या तुलनेत जॉगर्सची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले. जे नियमित व्यायामपटू आहेत त्यांचा अपवाद वगळता हंगामी व्यायामपटूंनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही.
थंडीची तीव्रता सोमवारी काहीसी कमी जाणवली असली तरी किमान तापमान अद्यापही दहा अंशांच्या खाली असल्यामुळे हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. नागरिकांना संध्याकाळपासूनच हुडहुडी भरली होती. तसेच पहाटेदेखील नेहमीच्या तुलनेत जॉगर्सची संख्या रोडावल्याचे चित्र दिसून आले. जे नियमित व्यायामपटू आहेत त्यांचा अपवाद वगळता हंगामी व्यायामपटूंनी घराबाहेर पडणे पसंत केले नाही.